लाच मागितल्याप्रकरणी पोलिस कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल

परभणी : पोलिसनामा ऑनलाइन – दाखल गुन्हा मिटवून घेण्यासाठी तसेच मदत करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

भानुदास उमाजी पवार (वय 41) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

भानुदास पवार हे परभणी जिल्हा पोलीस दलात कर्तव्यास आहेत. त्यांची नेमणूक जिंतूर पोलीस ठाण्यात आहे. दरम्यान यातील तक्रारदार यांच्यावर आणि त्यांच्या भावावर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यादरम्यान पवार यांनी या गुन्ह्यात मदत केली व तपासी अधिकारी यांना सांगून चार्जशीट लवकर तयार करण्यासाठी, हजेरी माफ करनेकामी व गुन्हा मिटवून देण्यासाठी 10,000/-रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी परभणी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता त्यात तडजोडी अंती 5 हजार रुपयांची लाच घेण्याचे पवार यांनी मान्य केल्याचे निष्पन्न झाले.

ही कारवाई नांदेड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनखाली उप अधीक्षक भारत के हुंबे यांच्या पथकाने केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/