धक्‍कादायक ! पोलिस कर्मचार्‍याकडून युवतीकडे ‘सेक्स’ची मागणी, युवतीला घरात कोंडून मारहाण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पोलिस कर्मचाऱ्यानेच युवतीकडे शरीरसुखाची मागणी करून वारंवार तिचा पाठलाग केला. तसेच त्याच्या आईशी बोलण्याचा बहाणा करून पोलीस मुख्यालयातील घरी नेले. घरात कोंडून घेत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पोलीस कर्मचारी योगेश धाईंजे व त्याची आई (पूर्ण नाव माहित नाही, दोघे रा. पोलीस कॉलनी, नगर) या दोघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, पोलीस कर्मचारी धाईंजे हा एका युवतीचा सुमारे एका महिन्यापासून वेळोवेळी पाठलाग करून शरीरसुखाची मागणी करीत होता. अश्लील शिवीगाळ करून फिर्यादीस लज्जा वाटेल, असे कृत्य करीत होता. शुक्रवारी दुपारी पोलीस कर्मचारी धाईंजे हा ‘माझ्या आईला तुझ्यासोबत बोलायचे आहे’, असा बहाणा करून तो युवतीस त्याचे मोटारसायकलवर बसवून पोलिस मुख्यालयातील घरी घेऊन गेला.

घरी गेल्यानंतर त्याने युवतीस घरात कोंडले. तसेच लाकडी काठीने मारहाण करून मोबाईल फोडून टाकला. शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्या आईने धाईंजे याला समजावून सांगण्याऐवजी युवतीलाच शिवीगाळ करून घरात कोंडून ठेवले व निघून गेली. याप्रकरणी युवतीच्या फिर्यादीवरून पोलीस कर्मचारी व त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पंकज शिंदे हे करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like