सलग 5 वर्ष रजेवर जाणारा पोलिस कर्मचारी ‘बडतर्फ’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईनंतर तब्बल पाच वर्षे रजेवर जात बेशिस्त वर्तन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास पोलिस सेवेतुन बडतर्फ करण्यात आले आहे. पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी आदेश दिला आहे. देवदत्त भागवत मोरे असे बडतर्फ केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

मोरे हे भोसरी पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी वाशी येथील एका नामांकीत बांधकाम व्यावसायिकाकडे लाच मागितली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यामध्ये अडकला होते. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. दरम्यान, संबंधित प्रकरण विभागीय चौकशी समितीपुढे गेले होते. विभागीय चौकशी अधिकाऱ्यांनी दोषारोप त्यांनी मान्य केले होते. त्यानंतर त्यास सेवेतुन बडतर्फ करण्यात आले. त्याबाबतचा आदेश त्यास देण्यात आला.

लाच मागितल्याप्रकरणी संबंधीत पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई झाली होती. त्यानंतर त्याचे निलंबन करण्यात आले. दरम्यान, पाच वर्षे गैरहजर राहून बेकायदेशीर व बेशिस्त वर्तन केल्यामुळे कर्मचाऱ्यास बडतर्फ केले अशी माहिती डॉ.रवींद्र शिसवे (सह पोलिस, आयुक्त) यांनी दिली.