पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला दोनशे रुपयांची लाच घेताना पकडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

ना हरकत पत्र देण्यासाठी पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी करुन दोनशे रुपयांची लाच स्विकारताना विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. ही कारवाई आज (सोमवार) करण्यात आली.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a1d1c709-a487-11e8-b3b1-af603cc7d459′]

उत्तम जनार्धन गट (वय-३८) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस नाईकचे नाव आहे. याप्रकरणी २५ वर्षीय तरुणाने तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम गट हे विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात पोलीस नाईक या पदावर नेमणूकीस आहे. तक्रारदार यांनी पोलीस ठाण्यात पडताळणी ना हरकत दाखला मिळण्यासाठी अर्ज केला होता. उत्तम गट यांनी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पाचशे रुपयांची मागणी केली होती. तडजोडीमध्ये दोनशे रुपये देण्याचे ठरले होते. याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार दिली. त्याप्रमाणे आज लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने सापळा रचून दोनशे रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.

पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक बलाप आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

इतर बातम्या

‘उमर खालिद’ हल्ल्याप्रकरणी दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात 

मनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होतोय : जितेंद्र आव्हाड

महापालिकेच्या सभागृहात माजी पंतप्रधान वाजपेयी यांचे तैलचित्र