शहर पोलीस दलातील गणेश जगताप आदर्श सेवा पुरस्काराने सन्मानित

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

सुर्यकांतसिंह परदेशी यांच्या स्मरणार्थ शिवप्रतिष्ठान प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेला गुणगौरव सोहळा यंदा माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थित संपन्‍न झाला. शहर पोलीस दलातील गणेश जगताप यांना शिवप्रताप प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा आदर्श सेवा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी पुरस्कार प्रदान करून गणेश जगताप यांना सन्मानित केले आहे.

[amazon_link asins=’B078RJN314,B06Y93HZW1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’980b3ad3-c548-11e8-8e9c-0989d2d55e75′]

भवानी पेठेतील टिंबर मार्केटजवळील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संस्कृतिक सभागृहात हा सोहळा दि. 30 सप्टेंबर रोजी पार पडला आहे. शहर पोलीस दलातील गणेश जगताप यांना यापुर्वी अनेक स्वयंसेवी संस्थेचे तसेच नामांकित प्रतिष्ठानचे पुरस्कार मिळालेले आहेत. गतवर्षी गणेश जगताप यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाने देखील सन्मानित करण्यात आले आहे. शिवप्रताप प्रतिष्ठानकडून डॉ. बालाजी तांबे आणि जन्मेजयराजे भोसले यांना आदर्शसेवा गौरव पुरस्कार, शहर पोलिस दलातील गणेश जगताप यांना आदर्श सेवा पुरस्कार, हनुमंत गायकवाड, अशोक खाडे, सचिन सातव, संजय भिसे, विजय चौधरी, आणि डॉ. रविंद्र पोमण यांना उद्योगरत्न पुरस्कार, संग्राम चौगुले यांना बलसेवा पुरस्कार, सुनिल भजनावळे यांना प्रशासनसेवा गौरव पुरस्कार, श्रीगौरी सावंत यांना आदर्शसेवा गौरव पुरस्कार, डॉ. हंसराज थोरात यांना ज्ञानसेवा गौरव पुरस्कार, अभिजित धोत्रे यांना पुरातन शस्त्रसंग्रहणसेवा पुरस्कार जाहिर करण्यात आले होते. रविवारी (दि.30) सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आले. गणेश जगताप यांना माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी पुरस्कार देवून सन्मानित केले.