पोलीस निरीक्षकाचा ‘डर्टी पिक्चर’ ; तक्रारदार महिलेस अश्लील मेसेज, व्हीडीओ कॉल करून त्रास

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्यानंतर महिलेचा मोबाईल क्रमांक घेऊन तिला अश्लील मेसेज, व्हीडीओ कॉल करून त्रास देणाऱ्या जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक हनुमंत गिरमे यांच्यावर अखेर सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होताच गिरमे रजा टाकून पसार झाले आहेत.

पतीसोबत झालेल्या किरकोळ वादासंदर्भात ३० वर्षीय महिला तक्रार देण्यासाठी जवाहनरनगर पोलीस ठाण्यात गेली होती. त्यावेळी त्यांनी तिचा मोबाईल क्रमांक घेतला होता. त्यानंतर त्यांनी महिलेला अश्लील मेसेज पाठविले तसेच व्हीडीओ कॉल करून त्रास दिला अशी तक्रार महिलेने केली होती. त्यानंतर तक्रार घेण्यास कोणीही नसल्याने या ठिकाणी मोठा जमाव जमला होता. त्यावर पोलीस उपायुक्त डॉ. राहूल खाडे यांनी जमावाची समजूत काढली होती. त्यानंतर महिलेने पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेऊन कैफीयत मांडली. त्यांनी सायबर पोलीस ठाण्याकडे ही तक्रार तपासासाठी सोपवली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक हनुमंत गिरमे यांच्यावर सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु ते ४ दिवसांपुर्वी पासूनच सीक लीव्ह टाकून गायब झाले आहेत.

Loading...
You might also like