१५०० रुपयांची लाच घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दुचाकी सोडण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी करत तडजोडीअंती १५०० रुपयांची लाच स्विकारताना उस्मानाबाद शहरातील आनंद नगर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपायाला एसीबीने रंगेहात पकडले आहे.

दत्ता जाधव असे पोलीस शिपायाचे नाव आहे.

तक्रारदाराची दुचाकी पोलिसांनी पकडली होती. ती सोडविण्यासाठी पोलीस शिपाई दत्ता जाधव यांनी ५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराला पाच हजार रुपये द्यायचे नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर तडजोडीअंती त्यांनी दीड हजार रुपयांची लाच मागितली. एसीबीच्या पथकाने पडताळणी करून सापळा रचला. त्यानंतर बुधवारी सायंकाळी जाधव यांना तक्रारदाराकड़ून १५०० रुपये स्विकारताना रंगेहात पकडले.

ही कारवाई एसीबीचे पोलीस अधिक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, पोलीस उपअधिक्षक बी.व्ही. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक विनय बहीर करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like