पोलीस कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

पुसद (जि. यवतमाळ) : पोलीसनामा ऑनलाईन

दंगानियंत्रक पथकातील पोलीस नाईक अनिस पटेल (वय-३० रा. दिग्रस, यवतमाळ) यांचा मृतदेह आज (बुधवारी) सकाळी पुसद शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात आढळून आला. पुसद पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या सभागृहाच्या मागील बाजूस आढळून आला. पटेल यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आळून आला असून त्यांनी स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली की हा घातपात आहे हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पटेल यांनी स्वत:जवळील पिस्तुलाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, त्यांनी आत्महत्या केली असेल, तर का केली व आत्महत्या नसेल, तर हा घातपात तर नाही ना, असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. मात्र, या घटनेने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील मूळ रहिवासी असलेले अनिस पटेल हे यवतमाळ, पुसद व उमरखेड येथे दर 15 दिवसांसाठी कार्यरत असत.

धडाकेबाज कारवाई  : लाच घेताना महिला पोलिस कर्मचार्‍याच्या पतीला अटक

आज बुधवारी सकाळी पुसद शहर पोलीस ठाण्याच्या परिसरातील सभागृहाच्या मागील बाजूस पटेल यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पोलीस कर्मचार्‍यांना दिसला. त्यांच्या मृतदेहाजवळच त्यांच्याकडील पिस्तूल व पेनही पडलेला दिसला. याबाबतचे वृत्त शहरात पसरताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. दरम्यान, ही घटना आत्महत्या आहे की, घातपात? या प्रश्‍नाचे उत्तर तपासानंतरच समजेल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.