CAA हिंसाचार : दिल्लीच्या मौजपुरमध्ये युवकाकडून पिस्तुलानं 8 राऊंड फायर, पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू तर DCP जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील जाफराबाद आणि मौजपूरमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन करणारे लोक आणि समर्थक आमने सामने आले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक करण्यात आली आणि गाड्या पेटवण्यात आल्या. यादरम्यान एक व्हिडिओ समोर आला ज्यात एक मुलगा गावठी कट्ट्याने हवेत गोळीबार करताना दिसला. मौजपूरच्या जाफराबाद रस्त्यावर गोळीबार झाला. या दरम्यान झालेल्या दगडफेकीत एका पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच एक डीसीपी जखमी झाल्याचे वृत्त आहे.

https://twitter.com/ShaheenBagh_/status/1231687707316781061

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मौजपूरपासून जाफराबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक मुलगा हातात गावठी कट्टा घेऊन हवेत गोळीबार करतो आहे. तो पोलिसांसमोर गोळीबार करत होता. या मुलाने 8 राऊंड झाडले. पोलिसांनी या मुलाला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु तो थांबला नाही आणि गोळीबार करतच राहिला.

मौजपूरमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. काल हिंसेनंतर आज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान दगडफेड झाली. सध्या दोन्ही गटांकडून करण्यात आलेली दगडफेक थांबली आहे.

पॅरामिलिटरी फोर्स तैनात –
स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसताच पोलिसांनी अश्रू धुराचा वापर केला. यानंतर या भागात पॅरामिलिटरी फोर्स शिवाय दिल्ली पोलीस तैनात करण्यात आले आहेत. परंतु या दोन्ही गटांची गर्दी तेथे अजूनही आहे.

कपिल मिश्रा यांच्या विरोधात तक्रार –
सीएए विरोधात रविवारी झालेल्या विरोध प्रदर्शनादरम्यान जाफराबाद, मौजपूर आणि दयालपूरमध्ये हिंसात्मक घटनांविरोधात पोलिसांनी 4 एफआयआर दाखल केल्या. रविवारी विविध परिसरात झालेल्या हल्लात 10 पोलिसांसह एक नागरिक जखमी झाला होता.

याशिवाय भाजप नेते कपिल मिश्रा यांच्या विरोधात जाफराबादमध्ये भडकावू भाषण देणे आणि हिंसा भडकवण्याचा आरोप करत जाफराबाद ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण कडकडडूमा न्यायालयात 6 वकीलांनी दाखल केले आहे.