Policeman Murder News | पोलीस हवालदाराच्या डोक्यात खलबत्ता घालून खून

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – Policeman Murder News | मुलगी नांदायला सासरी जात नाही यावरून झालेल्या वादामुळे मुलगी आणि पत्नीने पोलीस हवालदार (Police Havaldar) असलेल्या पतीच्या डोक्यात खलबत्ता घालून हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस (Kalyan Crime) आले आहे. ही घटना पूर्वेकडील नाना पेशवे चौक भागात गुरुवारी रात्री घडली. प्रकाश राजाराम बोरसे (Prakash Rajaram Borse) असे मृत पोलीस हवालदाराचे नाव असून याप्रकरणी पत्नी ज्योती (Jyoti) आणि मुलगी भाग्यश्री (Bhagyashree) या दोघींना कोळसेवाडी पोलिसांनी (Kolsewadi Police) अटक (Arrested) केली आहे. (Policeman Murder News)

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रकाश बोरसे हे मुंबईतील कुर्ला पोलीस ठाण्यात (Kurla Police Station) कार्यरत होते. गुरुवारी संध्याकाळी कामावरुन ते घरी परतले. नवऱ्याबरोबर पटत नसल्यामुळे मुलगी भाग्यश्री आई वडिलांकडेच राहते. ती नांदायला जात नाही म्हणून बोरसे यांच्या घरात वाद झाला. हा वाद इतका वाढला की, पत्नी ज्योती आणि भाग्यश्री हिने घरातील खलबत्त्याने प्रकाश यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. यात प्रकाश हे जागीच कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू (Died) झाला. (Kalyan Crime)

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख (Senior Police Inspector Bashir Shaikh) यांनी घटनास्थळी पथक रवाना केले. घटनास्थळी पोलीस आले असता त्यांना आतून दरवाजा बंद असल्याचे आढळले. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता प्रकाश यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तर मृतदेहाशेजारी माय-लेकी बसलेल्या आढळून आले. त्या दोघींनाही पोलिसांनी (Police) अटक केली आहे. (Policeman Murder News)

Web Title : Policeman Murder News | dispute over daughter murder police havaldar stabbing him head

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे,

केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर

Omicron Covid Variant | हलक्यात घेऊ नका ‘ओमिक्रॉन’ला, वाढवू शकतो तुमच्या अडचणी;
जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Calcium For Bones | ‘या’ 10 कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांचे करा सेवन, हाडे होतील मजबूत;
जाणून घ्या कमतरतेची लक्षणे

Aloe Vera Uses And Side Effects | कोरफडीचा वापर करणाऱ्या महिलांवर होतात ‘हे’ 5 दुष्परिणाम; जाणून घ्या

Sore Throat Problems | सर्दीपासून घसादुखीपर्यंत, गरम पाण्याचे सेवन हा एक प्रभावी घरगुती उपाय