संतोष मोहिते यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

पुणे : प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य पोलीस खात्यामध्ये 25 वर्षे सेवा अभिलेख उत्तम ठेवल्याबद्दल पोलीस महासंचालक पदक (बोधचिन्ह) यांनी युनिट-5मधील पोलीस हवालदार संतोष बापूराव मोहिते यांना पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित केले आहे. मोहिते यांना पोलीस महासंचालक पदक मिळाले, त्याबद्दल अनेक सामाजिक संस्था, संघटनांकडून अभिनंदन करण्यात आले. संतोष मोहिते पोलीस सेवेत पुणे शहरात पोलीस शिपाई म्हणून भरती झाले. बंडगार्डन, हडपसर, पोलीस मुख्यालय आणि क्राईम ब्रँच येथे त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली आहे. त्यांनी खून, मारामारी, दरोडे, जबरी चोरी, वाहनचोरी असे गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना पकडण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. पोलीस खात्यामध्ये 25 वर्षांच्या सेवेमध्ये विशेष कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी 379 बक्षिसे देऊन सन्मानित केले आहे. अधिकाऱ्यांकडून मिळालेली कौतुकाची थाप काम करण्यास प्रोत्साहनच देते, असे मोहिते यांनी सांगितले.