‘राडा’ घालणारा ‘तो’ पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत !

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाईन – दारु न दिल्याचा रागातून एका पोलीस शिपायाने तोडफोड केल्याची घटना हिंजवडी येथे घडली होती. पुणे पोलीस दलातील या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. तर त्याच्या तीन साथीदारांना हिंजवडी पोलीसांनी अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि. ४) रात्री एका हॉटेलमध्ये गोंधळ घातला होता.

अक्षय मोहन धुमाळ (वय २४, रा. भवानीपेठ, पुणे) असे निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याचे साथीदार अजय विजय खोत (वय २८), मंगेश महेंद्र रोकडे (वय ३१), जयंत बालमुकुंद साळुंके (वय २९, सर्व रा. पोलीस वसाहत, भवानी पेठ, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. हॉटेलमालक रामकिसन रमेश खैरनार (वय ३२, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

रविवारी रात्री अक्षय धुमाळ हा आपल्या तीन साथीदरांसह हिंजवडी येथे आला होता. आम्ही पोलीस आहोत, तू आमच्या माणसाला दारू का दिली नाही असे म्हणून त्यांनी हॉटेल मालक रामकिसन यांना शिवीगाळ केली. पोलीस खात्यातील बड्या अधिकाऱ्यांची नावे घेत धुमाळ याने धिंगाणा घातला. हॉटेल बाहेरच्या दुचाकी लाथ मारून पाडल्या तसेच चायनीज दुकानाची तोडफोड करून काच पोढली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.

आरोग्यविषयक वृत्त