Women Equality Day : ‘व्हायरल’ झाला ‘हा’ वेदनादायी Video, आज देखील महिलांचे जीवन महिलांचं जीवन ‘असं’ आहे ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज एकीकडे जगात सर्वत्र वूमन इक्विलिटी डे सेलिब्रेट करत आहे. तर दुसरीकडे सोशल मिडियावर व्हायरल एका व्हिडिओमध्ये महिलेबरोबर होणाऱ्या घरगुती हिंसाचार प्रकाश टाकण्यात आला आहे. महिलांना समान दर्जा देण्याच्या उद्देशाने 26 ऑगस्टला दरवर्षी वुमन इक्विलिटी डे सेलिब्रेट केला जातो.

घरगुती हिंसा समोर आणण्यासाठी हा व्हिडिओ जेनान माउसा यांनी शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करत जेनानने त्याला कॅप्शन दिले की, घरगुती हिंसापासून प्रत्येक माणसाला जागृत करणारा हा शानदार व्हिडिओ.

या व्हिडिओमध्ये दिसते की, रिलेशनपिशमध्ये आल्यानंतर काही काळात तिला अत्यंत चांगली वागणूक दिली जाते. हा व्हिडिओ पाहून कोणाचे ही मन हळवे होईल. तिच्या डोळ्यातील पाण्यातून तिला होणारा त्रास जाणवत होता. रिलेशनशिपनंतर महिलाबरोबर कशी परिस्थिती येते हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ पुरेसा आहे.

व्हिडिओत दिसणार महिला सुरुवातील खूप खुश असल्याचे दिसते, तिला लोक फूल आणि आंगठी सारखे अनेक भेटवस्तू देतात. जसे सामान्य मुलींच्या जीवनात होते. त्यानंतर मात्र मुलीचे जीवन पूर्णता बदलून जाते. व्हिडिओत सांगितले आहे की कोणतेही दु:ख असेल महिला ते हसत हसत सहन करते.
व्हिडिओत एक वेळ अशी देखील येते. जेव्हा महिला महिलेच्या चेहऱ्यावर मारल्याचे व्रर्ण असतात आणि ती ते मेकअपने झाकत असते. महिलेबाबत होणारे दुर्व्यवहार होतात ते या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारतात आज देखील अनेक महिलांबरोबर घरगुती हिंसा होते.

आरोग्यविषयक वृत्त –