पोलीसनामा इंम्पॅक्ट : प्रभाग क्रमांक १ मधील पाणीपुरवठा सुरळीत होणार

पोलीसनामा इंम्पॅक्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

कळस धानोरी भागाला अनियमित पाणी पुरवठा होत आहे. या पाणी टंचाई च्या निषेधार्थ 7 तारखेला विश्रांतवाडी येथील मुकुंदनगर आंबेडकर चौकामध्ये पालखी अडवून आंदोलन करणार असल्याचा इशारा पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका रेखा टिंगरे यांनी महापालिका प्रशासनाला दिला. ही बातमी पोलीसनामाने प्रसिद्ध केल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली असून अधिकाऱ्यांना नगरसेविका रेखा टिंगरे यांची भेट घेऊन दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरणीत करण्याचे आश्वासन दिले. यामुळे शनिवारी (दि.७) होणारे आंदोलन रद्द करण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B079L6LK4K’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7ff841f0-8121-11e8-b1b0-45c56dcd2c03′]

होळकर पंपींग स्टेशनमधून विद्यानगर पंपिंग स्टेशन ला कमी दाबाने पाणी पुरवठा मागील कित्येक दिवसापासून केला जात आहे.त्यामुळे प्रभाग क्रमांक 1 क कळस धानोरी भागाला अनियमित पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून पाणी पुरवठा सुरुळीत करावा. यासाठी पुणे महापालिका प्रशासनाशी अनेक वेळा पत्र व्यवहार केला. मात्र याची दखल न घेतली गेली नाही. याच्या निषेधार्थ 7 तारखेला विश्रांतवाडी येथील मुकुंदनगर आबेंडकर चौकात पालखी अडवून आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्टवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका रेखा टिंगरे यांनी पालिका प्रशासनाला दिला होता.

ही बातमी पोलीसनामाने प्रसिद्ध केल्यानंतर बातमीची दखल घेत पाणी पुरवठा अधिकारी व्ही.जी. कुलकर्णी, देवधर, रायकर, शेकटर यांनी नगरसेविका रेखा टिंगरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन तातडीने भेट घेतली. यावेळी पाणी पुरवठा अधिकारी कुलकर्णी यांनी दोन दिवसात पाणीप्रश्न सुरळीत करून देण्याचे आश्वासन टिंगरे यांना दिले. यावेळी प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच उपस्थित महिलांनी पोलीसनामाचे अभार मानले.