पोलीसनामा ऑनलाइन : दिवसभरातील टॉप 10 न्यूज

पोलीसनामा ऑनलाइन टीम –

Image result for अरुण जेटली प्रकृती चिंताजनक

1. अरूण जेटलींची प्रकृती अतिशय चिंताजनक –
मोदी सरकार – १ चे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी अर्थमंत्री अरूण जेटलींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची भेट घेवुन प्रकृतीची विचारपूस केली.

Image result for पाकिस्तानकडून एलओसीवर अंदाधुंद गोळीबार

2. पाकिस्तानकडून एलओसीवर अंदाधूंद गोळीबार –
जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासुन पाकिस्तान काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरविण्याचा तसेच सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. शनिवारी पाकिस्ताननं शस्त्रसंधीच उल्लंघन करत राजौरी जिल्हयातील नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार केला त्यामध्ये एक भारतीय जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे.

Image result for भारताला आव्हान देण्यासाठी पाकची तयारी

3. भारताला आव्हान देण्यासाठी पाकची तयारी –
जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरून पाक पंतप्रधान इम्रान खानने काश्मीर कमेटी बनवली असून त्याचे ७ सदस्य आहेत. त्यांची शनिवारी पहिली बैठक पार पडली. बैठकीदरम्यान भारताशी लढण्यासाठी रोडमॅप तयार करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Image result for रवी शास्त्री

4. रवी शास्त्री यांची सोनिया गांधींशी तुलना –
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची नियुक्ती झाल्याने क्रिकेटचे फॅन्स भडकले आहेत. त्यांनी रवी शास्त्री यांची तुलना थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी केली आहे. वर्ल्डकपमध्ये पराभूत झाल्यानंतर देखील रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याने फॅन्स सध्या नाराज आहेत.

Image result for पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसांच्या भूतान दौऱ्यावर

5. पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसांच्या भूतान दौऱ्यावर –
जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर भूतानला गेले आहे. भूतानमधील विमानतळावर पोहचल्या तेथील भारतीयांनी ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत मोदींचे स्वागत केले.

Image result for सामूहिक बलात्कार

6. दारू पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार –
सोलापूर जिल्हयातील पंढरपूर येथे एक धक्कादयक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर ५ नराधमांनी बलात्कार केला आहे. घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. पंढरपूरातील या घटनेमुळं राज्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Image result for विनोद तावडे

7. सोशल मीडिया संमेलन काळाजी गरज -विनोद तावडे –
सोशल मीडियावर फक्त जोक आणि फॉरवर्ड मेसेजेस येतात असे काही नाही. साहित्यिक खोली असणाऱ्या अनेक चांगल्या आणि दर्जेदार गोष्टी देखील येत असतात. त्यामुळं सोशल मीडिया संमेलन भरवणे ही काळाची गरज आहे असे मत मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत व्यक्त केले.

Image result for बुडून मृत्यू

8. गणपतीपुळे येथे ३ पर्यटकांचा बुडून मृत्यू –
पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील तिघांचा गणपतीपुळे येथे समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. त्यामध्ये दोन महिलांसह एका पुरूषाचा समावेश होता.

Image result for अमोल कोल्हे

9. खासदार अमोल कोल्हे पुन्हा मैदानात –
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पुन्हा १९ ऑगस्टपासून सुरू होत आहे. पुरपरिस्थितीमुळे तुर्तास स्थगित करण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा ६ ऑगस्ट पासून सुरू झाली होती. परिस्थिती पुर्ववत झाल्यानं आता ती पुन्हा १९ ऑगस्टपासुन सुरू करण्यात येणार आहे. १९ ते २६ ऑगस्ट पर्यंत ही यात्रा असणार आहे.

Image result for डॉ. नरेंद्र दाभोलकर

10. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी विक्रम भावेचा जामीन अर्ज फेटाळला –
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी विक्रम भावे याचा जामीन अर्ज शनिवारी शिवाजीनगर येथील न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर.एम. पांडे यांनी भावेचा जामीन फेटाळला आहे. भावेने घटनास्थळाची रेकी करण्यास मदत केल्याचा दावा सीबीआयने कोर्टात केला होता.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like