पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांची ऑल ऑउट मोहिम

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन

 

शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकाच वेळेस संपूर्ण पिंपरी-चिंचवड मध्ये ऑलऑउट मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत अंदाजे 400 पोलिस आणि 50 अधिकारी  सहभागी झाले आहेत

[amazon_link asins=’B01E06ZK8G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4747fcb6-7afb-11e8-a32f-cdb78982becb’]

या मोहिमेअंतर्गत रेकॉर्डवरील, फरार असणारे आणि पाहिजे असलेले गुन्हेगार तपासले. जाणार आहेत. त्याच बरोबर शहरातील काही भाग निश्चित करण्यात आले असून, एकाच वेळेस नाकाबंदी आणि शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे. गुरुवारी रात्री 9 वाजल्यापासून ही मोहिम सुरू झाली असून, शुक्रवारी पहाटे पर्यंत ती चालणार आहे.