महिनाभर कोमातील पोलिसाचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस ठाण्यात चक्कर आल्यानंतर सुमारे महिनाभरापासून कोमात असलेल्या पोलीस हवालदाराचा आज सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
सुरेश जगताप हे मयत पोलीस हवालदाराचे नाव आहे. ते शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात नियुक्तीस होते. जगताप हे ड्युटीवर असताना महिनाभरापूर्वी त्यांना पोलिस ठाण्यातच चक्कर येऊन पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. जगताप कोमात गेल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यात हलविण्यात आले होते. सुमारे महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, त्यांच्या प्रकृतीत कुठल्याही प्रकारची सुधारणा होत नव्हती. आज सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जगताप यांच्या मृत्यूमुळे जिल्हा पोलिस दलातून शोक व्यक्त केला जात आहे.
 काय होता आधार
जगताप यांना नेमका कोणता आजार होता, हे स्पष्टपणे सांगितले जात नाही. मात्र, त्यांच्या मेंदूला कमी रक्तपुरवठा झाल्याने ते चक्कर येऊन कोमात गेले होते, असे सांगितले जात आहे.