पुन्हा एकदा शरद पवारांचा मोदींवर घणाघात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुलवामा येथे दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या जवानांच्या मुद्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार शहिद झालेल्या जवानांच्या त्यागाचा राजकीय स्वार्थासाठी लाभ उठवित असून ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे. अशी घणाघाती टीका त्यांनी केली. कोल्हापुरातील कार्यकर्त्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलताना त्यांनी ही टीका केली.

आगामी निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. यादरम्यान, शरद पवार यांनीही मोदींच्या पावलावर पाऊल ठेवून कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. जवानांच्या वाहनांवर जेंव्हा हल्ला झाला, तेंव्हा देशभरातील सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी लष्काराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा तसेच राजकारण आणायचे नाही असा निर्धार केला. मात्र सत्तेतील लोकच त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न करु लागले आहेत. हल्याच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीत सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलविली. पण प्रधानमंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, भाजपचे पक्ष प्रमुख अशी मंडळी उपस्थित नव्हती. असे शरद पवार यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी तर हल्यानंतरही कामांची उद्घाटने करत, पक्षाचा प्रचार करत फिरत होते. तरीही आम्ही त्यावर टिका केली नाही. निवडणुका येतील आणि जातील. अशा कठीण प्रसंगात लष्कराच्या पाठीशी ठाम राहिले पाहिजे. याचबरोबर, मोदी सरकार शहिद झालेल्या जवानांच्या त्यागाचा राजकीय स्वार्थासाठी लाभ उठवित असून ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे. असेही त्यांनी म्हंटले.

मोदी सरकारने, सर्वसामान्यांच्या हिताचा कारभार केला नाही तर आपल्या लोकांच्या फायद्यासाठी सत्तेचा गैरफायदा घेतला. अशा प्रवृत्तींना दूर करण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे. असे म्हणत मोदींनी सरकारच्या कामाचा पंचनामा करुन तो जनतेसमोर मांडावा असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, आर. के. पोवार आदी उपस्थित होते.

ह्याही बातम्या वाचा –

केंद्र सरकारची मोठी घोषणा , ग्रॅच्युइटी करमुक्त !

भारतावर बॉम्ब हल्ले करण्यासाठी आम्ही ‘मसूद’चा वापर केला ; पाकिस्तान तोंडघशी

RBI लवकरच जारी करणार २० रुपयाचे नाणे ; ‘ही’ असणार नाण्याची खासियत

अखेर स्थायी सभापतीपदी विलास मडिगेरी यांची निवड

पुणे वाहतुक पोलिसांची ‘वसूली’ मोहिम जोरात