काँग्रेसनंतर आता SP अन् BSP ला ‘झटका’ ! ज्योतिरादित्यांच्या समर्थकांसह एकूण 22 MLA चे राजीनामे, Ex CM चौहानांची घेतली 2 आमदारांनी भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसच्या राजीनामा दिल्यानंतर आज ज्योतिरादित्य सिंधिया भाजपात प्रवेश करणार आहेत. अशात त्यांचे समर्थक असलेल्या 20 आमदारांनी राज्यपालांकडे आपल्या राजीनामा सोपावला आहे. या दरम्यान आता सपा आणि बसपाचे एक एक आमदार देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. कारण या आमदारांनी नुकतेच शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली आहे.

या दरम्यान ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्यानंतर ते भाजपात प्रवेश करणार याची चर्चा रंगली होती त्यानंतर ते पंतप्रधानांना भेटण्यासाठी अमित शाह यांच्या गाडीने गेले आणि पुन्हा परत आले. यानंतर त्यांनी सोनिया गांधीला लिहिलेला राजीनामा समोर आला ज्यावर 9 मार्च 2020 ही तारीख होती. सिंधिया यांनी आपला राजीनामा काल 9 मार्चलाच दिलेला होता. आज ट्विट करत त्यांनी याची औपचारिक घोषणा केली आहे. या दरम्यान त्यांनी आज पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतली. आज संध्याकाळी भाजपच्या सीईसीच्या बैठकीत ते भाजपमध्ये प्रवेश करतील.

मध्यप्रदेशात सुरु असलेल्या राजकीय नाट्य दरम्यान नवीन राजकीय खिचडी शिजत होती. काँग्रेसला याची माहिती मिळताच काँग्रेस हायकमांड देखील सक्रिय झाले. त्यांनी सिंधिया यांची नाराजी दूर करण्यासाठी सचिन पायलट यांना त्यांच्याशी बोलण्यासाठी पाठवले. कमलनाथ देखील सिंधिया यांना भेटणार होते परंतु त्यात त्यांना अपयश आले. सिंधियांच्या गटातील आमदारांनी राजकीय मार्ग निश्चित केला आणि 21 आमदारांनी सिंंधियाना समर्थन दर्शवले. या आमदारांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आले आहे.