सट्टेबाजार तेजीत, राज्यात वर्षभरात फेरनिवडणूक ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – राज्यात विधानसभा निवडणूकीचा निकाल समोर येऊन आठवडा उलटला तरी सत्ता स्थापनेचा दावा कोणाकडूनही करण्यात आला नाही. त्यामुळे राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा सुरु झाली आहे. निवडणूकीच्या काळात सक्रीय झालेला सट्टेबाजार निवडणूकीत देखील सक्रीय आहे. मात्र यावेळी सट्टेबाजारात वेगळीच चर्चा आहे, ती म्हणजे राज्यात वर्षभरात पुन्हा एकदा विधानसभा निवडणूका पार पडतील. सध्या तरी सरकार राहिल या शक्यतेचा दर फक्त 20 रुपये आहे अशी माहिती मिळत आहे.

सट्टेबाजाराच्या मते, राज्यातील स्थिती पाहता सरकार स्थापन झाले तरी जास्त काळ टिकणार नाही. त्यामुळे 2020 पर्यंत पुन्हा एकदा निवडणूक पार पडू शकते. नोकरदार वर्गाने देखील सरकार कोणाचं आणि राजकीय घडामोडींचा अंदाज घ्यायला सुरुवात केली आहे.

मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना ऑगस्टमध्ये आणखी तीन महिन्याचा अतिरिक्त कार्यकाळ मिळाला होता, जो आता 30 नोव्हेंबरला समाप्त होईल. तर पुन्हा एकदा भाजप सत्तेत आले आणि गृह खाते देखील भाजपकडे राहिले तर बर्वे यांना आणखी 3 महिन्यांच्या अतिरिक्त कार्यकाळ मिळेल. परंतू सत्ता बदल झाल्यास हा अतिरिक्त कार्यकाळ मिळण्याची शक्यता कमी आहे.

एका अधिकाऱ्याच्या मते, राज्याला फडणवीसांशिवाय जागी दुसरा मुख्यमंत्री मिळाला तर प्रवीण परदेशी यांच्या जागी मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदी दुसऱ्या एखाद्या अधिकाऱ्यांची वर्णी लागू शकते. हे कायम असते की एखादे नवे सरकार आले तर ते त्यांचे खास अधिकारी त्या त्या ठिकाणी बसवतात. त्यामुळे सत्ता स्थापनेची धाकधूक जेवढी राजकीय पक्षात आहे तेवढीच आतुरता प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना देखील लागली आहे.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या