शरद पवारांनी ‘देशहित’विरोधी वक्तव्य करणं दुर्दैवी : PM मोदी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – शरद पवार हे अनुभवी नेते आहेत. विरोधक म्हणून त्यांनी आमच्यावर टीका करावी मात्र, त्यांचे देशविरोधी वक्तव्य करणं दुर्दैवी असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. शरद पवारांना शेजारी देश चांगला वाटतो. ही त्यांची इच्छा आहे. तेथील प्रशासन त्यांना कल्याणकारी वाटतात. पण हे संपूर्ण देशाला माहिती आहे की, दहशतवाद्यांची फॅक्टरी कुठे आहे ? हिंसाचार शोषण झाल्याचे फोटो कुठून येतात ? असा सवाल करत त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जे सहकार्य करायला हवं होतं ते दिसत नाही. विरोधक म्हणून त्यांनी सरकार, माझ्यावर टीका करणं त्यांचा हक्क. पण राष्ट्रहिताच्या बाबतीत असं बोलणं जे शत्रुंसाठी फायद्याचं होईल, त्यावरुन भारतावर टीका होणं दुर्दैवी आहे. अशा लोकांना ओळखणं गरजेचं आहे. काँग्रेस गोंधळलं आहे हे समजू शकतो. पण शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता काही मतांसाठी चुकीचं विधान करत असेल तर फार दु:ख होतं, असेही मोदी म्हणाले.

जम्मू काश्मीरमध्ये हिंसा भडकावण्याचा प्रयत्न होत आहे. पण तेथील तरुण, महिला यांनी हिंसेतून बाहेर पडण्याची तयारी केली आहे. रोजगाराची संधी त्यांना हवी आहे. तुमचं हे सरकार तुम्हा सर्वांना सोबत घेऊन विकासाचं नवं युग सुरु कऱण्यास कटिबद्ध आसल्याचे मोदींनी सांगितले. नाशिकमध्ये आज भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप झाला. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्यावर भाष्य करताना माहाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे स्थिर सरकार निवडून देण्याचे आवाहन केले.

Visit – policenama.com