अहमदनगर : अनिल राठोडांना धक्का ! शिवसेनेकडून कदम, शिंदे, बोराटे, फुलसौंदर ‘दावेदार’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून माजी आमदार अनिल राठोड हे प्रबळ दावेदार मानले जातात. परंतु माजी महापौरांचे पती संभाजी कदम, अनिल शिंदे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे हे शिवसेनेकडून इच्छुक आहेत. त्यांच्या दावेदारीमुळे राठोड यांना मोठा धक्का मानला जाऊ लागला आहे. शिंदे व कदम या दोघांनी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करून विधानसभेची उमेदवारी मागितली. त्यामुळे राठोड समर्थक अस्वस्थ झाले आहेत.

एक माजी महापौर व दोन माजी महापौरांच्या पतींनी महापौर म्हणून केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. त्यामुळे आमदारकीची संधी दिल्यास शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली जातील, असा दावा या तिघांकडून करण्यात आला आहे. राठोड यांनी पंचवीस वर्षे आमदार म्हणून केलेले काम आणि संघटनेत दिलेले योगदान पक्षश्रेष्ठींसमोर सादर केले. शिंदे व कदम यांच्यासमवेत त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने होते. राठोड यांच्यासमवेत महापालिकेतील काही नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदे व कदम यांनी विधानसभा उमेदवारीवर प्रबळ दावेदारी केली आहे. त्यामुळे राठोड यांच्या समर्थकांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे.

कार्ले पारनेर, श्रीगोंदातून इच्छुक
जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी पारनेर आणि श्रीगोंदा या दोन्ही मतदारसंघातून आपली उमेदवारीवर दावा केला आहे. कार्ले हे पारनेर विधानसभा मतदार संघातून इच्छुक असल्याचे वृत्त ‘पोलीसनामा’ने प्रकाशित केले होते. आज झालेल्या मुलाखतीवेळी पारनेर मतदारसंघातून आपण किती सक्षम आहोत, हे पक्षश्रेष्ठींना त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

Visit – policenama.com 

 

You might also like