राष्ट्रवादीचा मोठा निर्णय ! पक्ष विरोधी काम करणाऱ्यांच्या ‘सर्च’साठी ‘शिस्तपालन’ समिती स्थापन, ‘या’ 12 दिग्गजांचा समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यस्तरीय शिस्तपालन समितीची स्थापना केली असून अध्यक्षपदी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची निवड करण्यात आली आहे. तर निमंत्रक पदी आमदार हेमंत टकले यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दांडेगावकर आणि टकले यांची नियुक्ती केली आहे. ही समिती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी पक्षविरोधी काम केले आहे त्याचा आढावा घेवून कारवाई करण्याचा अहवाल पक्षाला सादर करणार आहे.

NCP

या समितीमध्ये सदस्य म्हणून सुरेश घुले, श्रीमती उषाताई दराडे, डॉ. संतोषकुमार कोरपे, अमरसिंह पंडित, जयवंत जाधव, नसिम सिद्दीकी, विजय शिवणकर, हरिष सणस, रवींद्र पवार, रवींद्र तौर आदींचा समावेश आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तास्थापनेचा प्रयत्न केल्यामुळे पक्षाने हा निर्णय घेतल्याचीही चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात असल्याचे समजते. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर पक्षाची शिस्तपालन समिती निर्णय घेईल असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.

Visit : policenama.com