मतदानाच्या दिवशी मोबाईलला परवानगी नाही : API अंकुश माने

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन : आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांचा गावभेट दौरा चालू असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाण्याचे आवाहन त्यांच्या वतीने गावोगावी करण्यात येत आहे. त्यांनी नुकतीच पुरंदर तालुक्यातील नायगाव येथे भेट दिली यावेळी ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले मतदानाच्या दिवशी नियमांचे पालन करा. दोनशे मीटरच्या आतमध्ये कोणीही मोबाईल वापरू नका. मतदानासाठी आवश्यक आपल्या ओळखीचा ओरिजिनल पुरावा जवळ ठेवा. अपंग व्यक्तींना सहकार्य करा. व्हीलचेअरचा वापर करा. दोनशे मीटर आतमधील हॉटेल, दुकाने बंद ठेवा. मतदानाच्या दिवशी प्रचार करू नका. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करा. कोणीही कायदा हातात घेऊ नका. निवडणूक प्रक्रिया पार पाडणाऱ्या अधिकारी यांना सहकार्य करा. जास्तीत जास्त मतदान घडवून आणा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी गावातील पोलीस पाटील यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Visit : Policenama.com 

You might also like