Political Party Donations | पार्टी फंडामध्ये देखील भाजपा सलग 7 वर्ष काँग्रेसच्या पुढं, जाणून घ्या राष्ट्रवादीला किती मिळाला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशात भाजप आणि काँग्रेस हे दोन सर्वात मोठे पक्ष आहेत. राष्ट्रीय राजकारणात दोघांचा दबदबा कायम असला तरी पार्टी फंडमध्ये (Political Party Donations) भाजप आघाडी समोर आहे. केवळ आघाडी नाही तर काँग्रेस (congress) पेक्षा पाच पट अधिक भाजपला (BJP) देणग्या मिळत आहेत. निवडणूक आयोगाने छापलेल्या अहवालातून हि आकडेवारी समोर आली असून २०१९-२० या वर्षात भाजपला कॉर्पोरेट आणि व्यक्तिगत स्वरुपात तब्बल ७८५ कोटी देणगी मिळाली आहे. तर काँग्रेसला १३९ कोटी देणगी मिळाली आहे. या दोन्ही पक्षांची देणगीची तुलना केली तर काँग्रेसच्या ५ पट जास्त भाजपाला देणगी मिळाली आहे. तर याच कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस ५९ कोटी, तृणमूल काँग्रेस ८ कोटी, सीपीएम १९.६ कोटी आणि सीपीआय १.९ कोटी रुपये देणगी मिळाली आहे. (Political Party Donations)

पार्टी फंड

भाजपा  देणगीदारांच्या यादीत आयटीसी ग्रुप, रियल इस्टेट कंपनी मॅक्रोटेक डेव्हलपर्स(लोढा) आणि बी.जी शिर्के कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी, प्रूडेंट इलेक्ट्रोल ट्रस्ट आणि जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्ट तसेच भाजप खासदार राजीव चंद्रशेखर यांच्या ज्युपिटर कॅपिटलचा समावेश आहे.
प्रुडेंट इलेक्टोरल फंडच्या माध्यमातून २०१९-२० मध्ये भाजपला २१७.७५ कोटी रुपये देणगी मिळाली.
तर जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्टकडून ४५.९५ कोटी मिळाले आहेत. ज्युपिटर कॅपिटलकडून १५ कोटी, आयटीसी ग्रूप ७६ कोटी.
मॅक्रोटेक डेव्हलपर्स २१ कोटी तर गुलमर्ग रियलटर्सकडून २० कोटी मिळाले आहेत. बी.जी शिर्के टेक्नोलॉजीकडून भाजपाला ३५ कोटींची देणगी मिळाली आहे.

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! सरकारी कर्मचाऱ्याच्या कुटूंबातील सदस्याला कोरोनाची बाधा झाल्यास 15 दिवसांची रजा मिळणार

बांधकाम व्यावसायिक सुधाकर शेट्टी यांच्या रियल इस्टेट कंपनी गुलमर्ग रियल्टर्सकडून भाजपाला ऑक्टोबर २०१९ मध्ये २० कोटी रुपये देणगी मिळाली होती.
हि माहिती मिळाल्यानंतर जानेवारी २०२० मध्ये ईडीनं सुधाकर शेट्टी यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर छापा मारला होता.
१४ शिक्षण संस्थांकडूनही भाजपला फ़ंड मिळाला आहे.
दिल्ली मेवार यूनिवर्सिटी, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग.
जीडी गोयंका इंटरनॅशनल स्कूल, सूरत पठानिया पब्लिक स्कूलनेही यांनीही भाजपाला फंड दिला आहे.
देणगीसंदर्भात प्रादेशिक पक्षांचा विचार केला तर सर्वात जास्त देणगी मिळालेला पक्ष म्हणजे टीआरएस आहे.
टीआरएसला सर्वाधिक १३०.४६ कोटी देणगी मिळाली. वायएसआरसीपीला ९२ कोटी तर बीजेदला ९०.३५ कोटी मिळाले आहेत.

Web Title : Political Party Donations report party donations bjp got rs 750 crore 2019 20 over 5 times what congress got know about ncp