‘या’ कारणांमुळं विधानसभेत राष्ट्रवादीला फटका : शरद पवार (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देणारा दलित, नवबौध्द हा वर्ग राष्ट्रवादीच्या बाजूला आहे की नाही हे पाहिलं नाही. त्यामुळेच त्याचा फटका विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीला बसला आहे. आगामी काळात आपल्या कामाने हा समाज आपल्याकडे कसा येईल, यासाठी प्रयत्नशील असणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत सांगितले.

शरद पवार यांच्या उपस्थितीत आज (रविवार) मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात विधानसभा निवडणुकीत पराभू झालेल्या उमेदवारांसाठीची बैठक झाली. यावेळी शरद पवारांनी पक्षाच्या आगामी वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. पवार म्हणाले, निवडणूक झाली. निकाल काहीसा संमिश्र लागला तर काही ठिकाणी आणखी काम करणं गरजेचं असल्याचं लोकांनी लक्षात आणून दिले आहे. पराभवाला अनेक कारणे आहेत. केंद्रात आणि राज्यात त्यांचे सरकार असल्यानं त्याचा त्यांनी भरपुर वापर केला असा आरोप देखील पवारांनी यावेळी केला. मुंबईसह ठाण्यात देखील अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितलं. मुंबईत एकच जागा आली. मी पक्ष म्हणून तुमच्या पाठीशी शक्ती उभी करणार आहे. त्याचा तुम्ही योग्य वापर करून घ्या. राज्यात आपणच अग्रभागी आहोत, हे लक्षात आणून देवू असे आवाहन देखील उपस्थितांना केले.

सत्ताधार्‍यांबाबत जनतेत प्रचंड रोष
इगतपुरी येथील आदिवासी समाज पाडयात गेलो असताना तिथं सत्ताधार्‍यांबाबत प्रचंड राग पहावयास मिळाला. या सर्वांना एकत्रित करावं लागणार आहे. त्यांना आपण त्यांच्या पाठीशी आहोत असा विश्वास दिला पाहिजे. आगामी काळात असे काम करायचे आहे असेही शरद पवारांनी उपस्थितांना सांगितले.

युवकांचा चांगला पाठिंबा
युवकांनी पक्षाला चांगलाच पाठिंबा दिला आहे. यंदा अल्पसंख्याक समाजाची शक्ती राष्ट्रवादीच्या पाठीशी राहिली. काही झालं तरी चालेल पण भाजप नको असे त्यांनी ठरवले होते. तसेच शेतकर्‍यांनी देखील पाठिंबा दिला. मात्र, काही ठिकाणी आपण मागे पडलो असेही पवार यावेळी म्हणाले.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या