बिहारमध्ये मोदी- नितीश कुमार यांच्या लोकप्रियतेत वाढ  

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तीन राज्यांमधील पराभवानंतर भाजप आणि एनडीएची चांगली बातमी आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांची लोकप्रियता सध्या बिहारच्या जनतेत वाढत आहे. तसेच बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री असलेल्या आणि विकासपुरुष म्हणून उदयाला आलेले नितीश कुमार सध्या लोकसभेच्या निवडणुकीला त्यांच्या करिष्म्याचा प्रभाव पाडून जातील अशी शक्यता एका इंग्रजी वृत्त संस्थेने केलेल्या सर्व्हेतून पुढे आली आहे.

मागील  तीन महिन्यांमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांची लोकप्रियता वाढली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या राजकीय स्टॉक एक्स्चेंजच्या अहवालानुसार, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची लोकप्रियता पूर्वीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढली आहे. बिहारमध्ये त्यांची लोकप्रियता सप्टेंबरमध्ये ५८ टक्के होती, नोव्हेंबर मध्ये ६० टक्के होती, आता ती ६१टक्के झाली आहे. त्याच वेळी ६० टक्के लोक केंद्र सरकारच्या कामकाजाशी समाधानी आहेत असे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

नीतीश कुमार चमकता  तारा 

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मधील पराभवानंतर डिसेंबर २०१८ च्या बिहारच्या पीएसई अहवालाने भाजप आणि एनडीएला चांगली बातमी दिली आहे. PSE अहवालाने  उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी यांच्या लोकप्रियतेचाहि सर्वे केला असून गेल्या आठवड्यात नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत या महिन्यात  ३८ टक्के घसरण झाली आहे.  सप्टेंबर महिन्यामध्ये योगी आदित्य यांची  ४३ टक्के लोकप्रियता होती तर योगीची लोक्रियता घटने हि  भाजपसाठी चांगली बातमी नाही. पण सप्टेंबरमध्ये ४६ टक्के लोक नीतीशकुमार यांच्या लोकप्रियतेत होते, तर ४९टक्के लोकांनी मुख्यमंत्रीपदाच्या निवडणुकीत नितीश कुमार यांना मत  दिले आहे.

त्याच प्रमाणे नितीश कुमार यांच्या सरकारच्या कामगीरीवर ५३टक्के लोकांना समाधान वाटते. तर नोव्हेंबरमध्ये हा आकडा ४६ टक्के होता. याचा अर्थ असा आहे की बिहार सरकारच्या कामगिरीने लोक आनंदी आहेत तसेच बिहार सरकारची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

नोव्हेंबर २०१५ मध्ये, नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधनाने २४३ विधानसभा जागांपैकी १७८जागा जिंकल्या होत्या. त्या निवडणुकीत भाजपने ५३ जागा जिंकल्या होत्या. तसेच त्याच वेळी भाजपच्या मित्र सहकार्यांना ५ जागा मिळवल्या होत्या. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्या नंतर गेल्या वर्षी  जुलै महिन्यात  नितीश कुमार महागठबंधन तोडून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्याची लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाचे सदस्य आपोआप मंत्री पदावरून दूर झाले. तेव्हा भाजपच्या पाठींब्याने नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री म्हणून सत्ता रूढ झाले. तो निर्णय  जनतेला पटला आहे हे अहवाला वरून स्पष्ट होते आहे.

नीतीश यांच्या मागे उंचावत यादव

इंग्रजी वृत्त संस्थेच्या अहवाला नुसार  २९ टक्के लोकांनी  मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांचे काम पसंत नसल्याचे म्हणले आहे . तर ४९ टक्के लोकांनी नीतीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदासाठी पसंती दर्शविली आहे. ४९ टक्के लोकांचा आकडा छोटा नसतो याच आकड्याच्या जोरावर नितीश आणि नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुकीत बिहारमध्ये चांगली कामगिरी करण्याचा संभव आहे.