मार्च एप्रिलमध्ये महाराष्ट्रात राजकीय भूकंप ? शिवसेनेचा भाजपाला ‘गंभीर’ इशारा

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं, त्यानंतर पुडुचेरीमधील काँग्रेस सरकार कोसळलं. काही दिवसांपूर्वी पुडुचेरीमध्ये काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी भाजपाला(BJP) गंभीर इशारा दिला आहे. या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातही राजकीय भूकंप होणार का? अशी चर्चा सुरु आहे.

यावेळी शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, की महाराष्ट्र आणि पुडुचेरीमध्ये फरक आहे, याठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आहेत, येथे शिवसेना(Shivsena) घटक पक्षांनासोबत महाविकास आघाडीचं सरकार चालवत आहे, महाराष्ट्रात शिवसेना आहे, त्यामुळे नुसती उठाठेव करू नये, जे पेराल तेच उगवेल याचं भान ठेवावं असं त्यांनी बजावलं आहे, पुडुचेरीसारखे(Puducherry) छोटे राज्यसुद्धा भाजपानं काँग्रेसकडून खेचून घेतलं, आता मार्च एप्रिलमध्ये महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरू करणार असल्याचं भाजपा पुढाऱ्यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीत काय झालं? हे माहिती नाही, पोहरादेवी गडावर जी गर्दी झाली, नियमांचे उल्लंघन झालं त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दात कारवाई करण्याचे आदेश दिलेत,

दरम्यान, आपला माणूस असला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोडणार नाही, मुख्यमंत्री कायदा आणि सुव्यवस्थेबाबत खूपच कठोर आहेत. कायदा आपला काम करेल, संजय राठोडबाबत जे काही वक्तव्य आहे ते राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करू शकतात असं सांगत संजय राठोड प्रकरणात जास्त भाष्य करण्यास नकार दिला आहे. त्या तसेच दिल्लीत जे लोक बसले आहेत, ते सत्ता आणि पैशाचा जो गैरवापर करत आहेत ते देशासाठी योग्य नाही, देशात विरोधी पक्ष नसेल तर लोकशाही नाही, आणि लोकशाही नसेल तर देश नसेल आणि देश नसला तर देशी ईस्ट इंडिया कंपनी बनेल अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. चसोबत महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र नेहमी होत असतं, परंतु आम्हीदेखील सक्षम आहोत, त्यांना टक्कर द्यायला असंही राऊतांनी म्हटलं आहे.