काँग्रेसनं PM मोदींच्या 20 लाख कोटीच्या आर्थिक पॅकेजची उडवली ‘खिल्ली’, ट्विट केला जुना व्हिडिओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटामुळे जगातील अर्थव्यवस्था विनाशाच्या मार्गावर आहेत. भारताची स्थितीही इतर देशांपेक्षा वेगळी नाही. ही आपत्ती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संध्याकाळी ८ वाजता आपल्या भाषणात २० लाख कोटी रुपयांच्या भव्य पॅकेजची घोषणा केली. ही रक्कम देशाच्या एकूण जीडीपीच्या १० टक्के आहे. पंतप्रधानांच्या या घोषणेवर मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसने निशाणा साधला आहे. पहिले काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या घोषणेला केवळ एक मथळा म्हटले. तर मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीने ट्विटद्वारे पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजची खिल्ली उडवली आहे.

मध्य प्रदेश काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, विषय काढला तर प्रत्येकाला हसू येईल..! इथे काँग्रेसने असे लिहिले आहे की, मोदीजींचे काही पॅकेजेस आठवा. संपूर्ण देशाला १०० लाख कोटी, बिहारला १.२५ लाख कोटी, जम्मू-काश्मीरला ५५ हजार कोटी. काँग्रेसने ठामपणे म्हटले आहे की, ना तेव्हा मिळाले होते, आणि यावेळीही मिळणार नाही, हे जुमलांचे फूल आहे, खोटे होऊन फुलेल. पाहा! असेच आता २० लाख कोटीही मिळतील..? यानंतर पंतप्रधानांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर दिलेल्या भाषणाचा व्हिडिओ काँग्रेसने शेअर केला असून त्यामध्ये पंतप्रधान मोदी देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर १०० लाख कोटी रुपये खर्च करण्याची मागणी करत होते.

सुरजेवाला म्हणाले हेडलाईन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजच्या घोषणेनंतर काँग्रेससने म्हटले की, मोदींनी माध्यमांना केवळ ‘हेडलाईन’ दिली, परंतु प्रवासी कामगारांसाठी कोणतीही ‘हेल्पलाईन’ दिली नाही आणि त्यांच्यातील संवेदनशीलतेच्या अभावाने देश निराश झाला आहे. सुरजेवाला यांनी असेही म्हटले की, पंतप्रधानांची घोषणा कोऱ्या पानाप्रमाणे आहे आणि तपशील समोर येईल तेव्हा देश आणि काँग्रेस प्रतिक्रिया देईल. त्यांनी ट्वीट केले, “परप्रांतीय कामगारांच्या घरी परत जाण्याच्या हृदयद्रावक मानवी शोकांतिकेकडे सहानुभूतीने आणि आपलेपणाने पाहण्याची तसेच सुरक्षितपणे परतण्याची आवश्यकता आहे. लाखो स्थलांतरित कामगारांबद्दल तुमच्यात संवेदनशीलतेचा अभाव आणि त्यांच्या समस्या सोडवण्यात तुमचे अपयश यामुळे भारत अत्यंत निराश झाला आहे.”