AIMIM नेत्याचं वादग्रस्त विधान, ‘कोरोना’ म्हणजे मुस्लिमांना ‘नपुंसक’ बनवण्याचे ‘षडयंत्र’ (व्हिडीओ)

नवी दिल्ला : वृत्तसंस्था – संपूर्ण देश कोरोना विषाणूविरोधात लाढा देत आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने अनेक भाग कंटेनमेंट झोन बनवून लोकांची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, असदुद्दीन औवैसी यांच्या पक्षाच्या एका नेत्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये, पक्षाचा नेता कोरोना संक्रमणाबाबत बोलताना विशेष समुदाय अर्थात मुस्लिमांवर उपचार करण्यास नकार देत आहेत असा आरोप केला आहे.

हा व्हिडिओ एमआयएमचे नेते फैजल यांचा आहे. या व्हिडिओत फैजल यांनी दावा केला आहे की, करोना फक्त एक कारण आहे. खरं तर मुस्लीम समाजाची संख्या वाढू नये यासाठी सरकार आणि डॉक्टर मिळून मुस्लीम महिलांना इंजेक्शन देत आहेत. जेणे करून त्यांना मुलं होऊ नयेत. याचे सबळ पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा फैजल यांनी केला आहे. आपल्या व्हिडिओत फैजल यांनी अश्लिल भाषा वापरत मुस्लीम लोकांना सूचना दिल्या आहेत. मुस्लीमांनी कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन घेऊ नये आणि जर कोणी इंजेक्शन घेण्यास वारंवार सांगत असेल तर त्याचे हात तोडा किंवा ते इंजेक्शन त्यालाच द्या. पुढे बोलताना फैजल यांनी म्हटले आहे की, कोरोना-शिरोना काहीही नाही. हा आरएसएस व्हयरस आहे. मुस्लीम आणि इस्लामला लक्ष करत रहा याच कामावर त्यांनी मीडियाला कामाला लावले आहे. जेणे करून देशाचे वातावरण खराब होऊ शकेल.

तत्पूर्वी हैदराबाद ओल्ड सिटीमधील एआयएणआयएमचे आमदार कंटेनमेंट झोनमध्ये पोहचले आणि त्यांनी पालिका अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली. हैदराबादचा ओल्ड सिटी परिसरातील कंटेनमेंट झोनमधील नागरिक अचानक बेकाबू झाले. तर दुपारी ओल्ड मलक पेठ परिसरातील कंटेनमेंट झोनमधील लोकांनी विरोध प्रदर्शन सुरु केले. त्यांचा आरोप आहे की, हैदराबाद महानगर निगमच्या लोकांकडून त्यांना मदत मिळत नाही. अत्यावश्यक असलेल्या वस्तूंचा पुरवठा होत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. एवढेच नाहीतर मुलांना दुध देखील मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, नागरिकांनी केलेले सर्व आरोप अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले आहेत. नागरिकांना त्यांना आवश्यक असलेल्या वस्तूंचा पूरवठा केला जात अल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.