‘आणीबाणी एक चूक होती, आणि माझ्या आजीनं सुद्धा तसे मान्य केलं होते’ – राहुल गांधी

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी म्हटले की, त्यांची आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधीनी लावलेली आणीबाणी एक चूक होती. त्यांनी म्हटले की, त्या दरम्यान जे काही झाले ते चूक होते परंतु सध्याच्या स्थितीपेक्षा खुपच वेगळे होते, कारण काँग्रेसने कधीही देशाच्या संस्थात्मक संरचनेवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला नाही. काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी म्हटले की, मला वाटते की, आणीबाणी एक चूक होती आणि माझ्या आजीने तसे म्हटले होते.

काँग्रेसने देशाला त्याचे संविधान दिले
अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठातील प्रोफेसर आणि भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार कौशिक बसु यांच्यासोबत झालेल्या चर्चेत गांधी यांनी म्हटले की, ते काँग्रेसमध्ये अंतर्गत लोकशाहीच्या बाजूने आहेत. केरळच्या वायनाडमधून खासदार असलेल्या राहुल यांनी म्हटले की, काँग्रेसने भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढाई लढली, देशाला त्याचे संविधान दिले आणि समानतेसाठी उभी राहिली. आणीबाणीवर विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, मला वाटते की, ती एक चूक होती. खरोखरच, ती एक चूक होती. आणि माझ्या आजीने सुद्धा असे म्हटले होते.

आणीबाणीत जे झाले ते चूक होते
आणीबाणीच्या शेवटी इंदिरा गांधी यांनी निवडणुकीची घोषणा केली होती, यााबाबत प्रणब मुखर्जी यांनी बसु यांना म्हटले होते की, त्यांनी असे यासाठी केले, कारण त्यांना पराभवाची भिती होती. याबाबत प्रश्न विचारला असता राहुल गांधी म्हणाले की, आणीबाणीमध्ये जे काही झाले ती चूक होती आणि त्यामध्ये आणि आजच्या परिस्थितीत मूलभूत अंतर आहे.

राहुल यांना आठवली कमलनाथ यांच्यासोबतची चर्चा
चर्चेच्या दरम्यान राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासोबत त्यांचे सरकार पडण्यापूर्वी झालेल्या एका चर्चेची आठवण सांगितली. कमलनाथ यांनी त्यांना म्हटले की, त्यांच्या सरकारमध्ये वरिष्ठ नोकरशाह त्यांचे ऐकत नाहीत कारण ते आरएसएसचे लोक होते आणि त्यांना जे करायला सांगितले जात होते ते करत नव्हते.