विकासात राजकारणाला थारा नाही : आ.चंद्रकांत पाटील

बोदवड : पोलीसनामा ऑनलाइन – येथील नगरपंचायत कार्यालयात विविध विकास कामांचा शुभारंभ सोहळा संपन्न झाला. उद्घाटक म्हणून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुसावळ पंचायत समितीचे माजी सभापती विरेंद्रसिंग पाटील होते.

यावेळी आपल्या मनोगतात आ. चंद्रकांत पाटील यांनी बोलताना सांगितले, आपण राजकारण करण्यासाठी नाही तर विकास कामे करण्यासाठी आमदारकी करणार असून मतदार संघातील विविध प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मतदार संघात विकास कामे करतांना राजकारण बाजूला ठेवून बोदवड तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मतदार संघात विकास करतांना त्यात राजकारणाला थारा दिला जाणार नाही असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

विरोधक आणि सत्ताधारी यांना एकत्र घेऊन आपण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असून आपले राजकारणातील तात्विक वाद हे बाजूला ठेवून विकासात कुठल्याही प्रकारचे राजकारण केले जाणार नाही.  अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलतांना दिली. त्याचंबरोबर आपण तालुक्यात पाणी प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी शिरपूर पॅटर्न योजना, राबविणार आहे. जेणेकरून येथील नागरिकांना पिण्यासाठी शुध्द व मुबलक पाणी तसेच वापरासाठी मुबलक पाणी या योजनेतून मिळणार असून तालुक्यातही योजना राबविण्यासाठी आपण सर्वोपरी प्रयत्न करीत आहे. अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

व्यासपीठावर नगर पंचायत नगराध्यक्षा मुमताजबी हाजी सईद बागवान, नगरसेवक कैलास चौधरी, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन खोडके, शिवसेना मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनिल पाटील, प्रतिष्ठित व्यापारी मिठूलालजी अग्रवाल, नगर पंचायत कार्यालयीन अधीक्षक राजुसिंग चव्हाण, नगरसेवक दिपक झांबड, नितीन चव्हाण, देवेंद्र खेवलकर, सुनील बोरसे, असलम बागवान, सौ. रेखा संजु गायकवाड, डॉ. सुधीर पाटील, उपनगराध्यक्ष दिनेश माळी,म धुकर राणे, ईश्वर जंगले, विजय पालवे, संजु गायकवाड, हाजी सईद बागवान, आनंदा पाटील, इरफान शेख, सलीम कुरेशी उपस्थित होते.

यावेळी नगर पंचायतीच्या विविध प्रभागातील मंजुर असलेल्या २ कोटी ८८ लाख रुपयांच्या विकास कामांचे भुमिपुजन आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/