Politics In Cricket | टीम इंडियामध्ये ‘एन्ट्री’ केल्यानंतर ‘राजकारणा’मुळे बिघडले ‘या’ 11 भारतीय खेळाडूंचे करियर, जाणून घ्या

जयपुर : वृत्तसंस्था – Politics In Cricket | भारतीय क्रिकेटमध्ये राजकारणाचा महत्वाचा भाग आहे. यामुळे अनेकदा खेळाडूंना त्याचे परिणाम भोगावे लागतात. आज या वृत्तात आपण 11 अशा खेळाडूंबाबत जाणून घेणार आहोत, ज्यांचे करियर क्रिकेटमधील राजकारणामुळे (Politics In Cricket) संपुष्टात आले.

जयदेव उनादकट (Jaydev Unadkat) –
स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करूनही जयदेव उनादकटला अंतरराष्ट्री टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. जयदेवने 2010 मध्ये भारतीय टेस्ट क्रिकेट टीममध्ये डेब्यू केला होता.

अमित मिश्रा (Amit Mishra) –
हरियाणाच्या या क्रिकेटरने आपल्या स्पीन गोलंदाजीने मोठ-मोठ्या खेळाडूंना क्रिकेटच्या मैदानावर आऊट केले आहे. तीनही प्रकारात खेळलेला अमित राजकारणाचा बळी ठरला.

स्टुअर्ट बिन्नी (Stuart Binny) –
स्टुअर्ट बिन्नी एक दोन सामन्यात खराब कामगिरी केल्यानंतर पुन्हा टीममध्ये येऊ शकला नाही. त्याची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी होती.

वरुण एरोन (Varun Aaron) –
झारखंडच्या वरुण एरोनच्या गोलंदाजीचा स्पीड खुप आहे. भारतीय टीममध्ये त्याला जास्त संधी दिली गेली नाही, यामुळे त्याचे करियर संपुष्टात आले.

जयंत यादव (Jayant Yadav) –
गोलंदाजीसह फलंदाजीत सुद्धा चांगली कामगिरी करणार्‍या जयंत यादवने 2016 मध्ये इंग्लंडविरूद्धा सामना खेळून कसोटीत पदार्पण केले होते. त्याने चार कसोटी सामने खेळत 228 धावा केल्या, आणि 11 विकेट घेतल्या.

करुण नायर (Karun Nair) –
नायरने टेस्ट क्रिकेटमध्ये त्रिशतक केले आहे तरी सुद्धा मोठ्या कालावधीपासून टीमच्या बाहेर आहे. त्याचे करियर अंतर्गत राजकारणामुळे संपुष्टात आल्यासारखेच आहे.

विनय कुमार (Vinay Kumar) –
क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमध्ये सन्यास घेतलेल्या विनय कुमारने कर्नाटकच्या टीमला अनेक ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. भारतीय इंटरनॅशनल टीममध्ये जास्त संधी न दिल्याने त्याचे करियर संपले आहे.

करण शर्मा (Karan Sharma) –
मुंबई टीमसाठी आयपीएल खेळलेल्या शर्माने फिरकी गोलंदाजीने बड्या फलंदाजांना आऊट केले आहे. मात्र त्याला जास्त संधी दिली गेली नाही.

अभिनव मुकुंद (Abhinav Mukund) –
डावखुरा फलंदाज अभिनव मुकुंदने 2011 मध्ये सलामीचा फलंदाज म्हणून भारतीय कसोटी संघात स्थान निर्माण केले होते. त्याने 7 कसोट्या खेळल्या. मात्र, नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष केले गेले.

अभिमन्यु मिथुन (Abhimanyu Mithun) –
कर्नाटकसाठी रणजी क्रिकेट खेळणार्‍या अभिमन्यु मिथुनने 2010 मध्ये श्रीलंकेविरूद्ध भारतीय कसोटी टीममध्ये पदार्पण केले होते.
पहिल्याच सामन्यात त्याने 4 विकेट घेतल्या होत्या. मात्र, अभिमन्यु मिथुन अंतर्गत राजकारणाला कंटाळून क्रिकेटमधून निवृत्त झाला.

पंकज शर्मा (pankaj sharma) –
पंकज शर्माला भारतीय टेस्ट टीममध्ये सहभागी करण्यात आले होते आणि केवळ एकच टेस्ट खेळण्याची संधी दिली. पंकज शर्माचे सुद्धा क्रिकेट करिअर राजकारणामुळे बरबाद झाले, कारण त्याला संधी दिली गेली (Politics In Cricket) नाही.

Web Titel :- Politics In Cricket | Find out the careers of 11 Indian players who were ruined by politics after their entry in Team India.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalna Crime | धक्कादायक ! जावयानं सासर्‍याला नदीपात्रात नेलं, दोघांच्या मदतीनं सपवलं; प्रचंड खळबळ

Modi Cabinet Decision | सिम कार्डपासून टॉवर उभारण्यापर्यंतचे नियम बदलणार, टेलीकॉम कंपन्यांसाठी मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय

Pune Crime | पुण्याच्या कोंढव्यात 10 % व्याज आणि मित्राकडून होणाऱ्या त्रासाला वैतागून युवकाची आत्महत्या, ‘दोस्त’ आला गोत्यात