भोपाळमध्ये दिग्विजय म्हणाले, ‘जितेंद्र आव्हाड महाराष्ट्रातले दिग्विजय सिंह’ !

भोपाळ : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोमात सुरु आहे .पाच टप्प्यांची मतदान प्रक्रिया पार पडली असून आता सहाव्या टप्प्यासाठी प्रचार सुरु आहे. भोपाळमधून दिग्विजय सिंग हे काँग्रेसकडून उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड हे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या प्रचारासाठी मध्य प्रदेशात दाखल झाले आहेत. मध्य प्रदेशात दिग्विजय सिंग आणि साध्वी प्रज्ञा सिंग अशी सरळ लढत होत आहे.

साध्वी प्रज्ञाने हेमंत करकरे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे आणि मालेगाव बॉम्बस्फोटातीळ आरोपांमुळे जितेंद्र आव्हाड साध्वी प्रज्ञा यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी गेले आहेत . यावेळी दिग्विजय सिंह यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासोबतच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली. “जितेंद्र आव्हाड म्हणजे महाराष्ट्रातले दिग्विजय सिंह आणि भोपाळमधले दिग्विजय सिंह म्हणजे मध्य प्रदेशचे जितेंद्र आव्हाड”, असं दिग्विजय सिंह म्हणाले.दरम्यान, भोपाळमध्ये १२ मे रोजी मतदान होत आहे. महाराष्ट्रातून महाआघाडीचे खूप नेते दिग्विजय सिंग यांच्या प्रचारासाठी भोपाळमध्ये दाखल झाले आहेत.

काय होते वादग्रस्त वक्तव्य :

प्रज्ञा ठाकूर म्हणाली होती, “हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीने खटल्यात अडकवलं. त्यामुळे त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळालं”, असं साध्वी म्हणाली होती. याबाबत तिने कोणत्याही प्रकारची माफी अजून मागितलेली नाही . अडकवणाऱ्या हेमंत करकरेंना दहशतवाद्यांनी मारुन माझं सूतक संपवलं ,असेदेखील विधान त्यांनी केलं होतं .