देशाला VIP ‘कल्चर’ संपवतंय, खासदार, आमदारांच्या मुलांनी ‘सरकारी’ शाळेत ‘शिकावं’ : BJP खासदाराची मागणी

जयपूर : वृत्तसंस्था – खासदार, आमदार झाल्यावर आपल्या अवतीभवती लोकांचा गराडा असावा. संरक्षक म्हणून बंदुकधारी पोलीस असावा, अशी असंख्य खासदार, आमदारांची इच्छा असते. लाल दिव्याच्या गाडीतील या माननीयांचे कुटुंबिय खरेदीसाठी जात असतात. त्यावेळी त्यांचा रुबाब काही औरच असतो. आता हे व्हीआयपी कल्चर संपविण्यासाठी एक खासदार आपल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आतापर्यंत कधीही व्हिआयपी सुविधा घेतलेल्या नाहीत. खासदार, आमदार आणि सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या मुलांना सरकारी शाळांमध्ये शिकवावे, अशी मागणी त्यांनी केली असून संसद अधिवेशन सुरु झाल्यावर त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

हे खासदार आहेत हनुमान बेनिवाल बेनिवा. ते राजस्थानमधील नागौर मतदारसंघातून निवडून आले आहेत. ते म्हणतात की, व्हीआयपी कल्चर समाप्त करण्याचा प्रस्ताव आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ठेवणार आहोत. त्यामुळे मोठमोठ्या लोकांना व्हीआयपी कल्चरचा मोह संपेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेत्यांच्या गाड्यांवरील लाल बत्ती हटविल्यानंतर व्हीआयपी कल्चर समाप्त करण्याची एक लहर देशात आली होती.

बेनिवाल म्हणाले की, आता अधिकारी आणि नेत्यांनी आपल्या मुलांना सरकारी शाळेत पाठविण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिआयपी कल्चर समाप्त करण्याच्या भावनेतून प्रेरित होऊन आपण आतापर्यंत कोणतीही व्हीआयपी सुविधा घेतली नाही. संसदेचे अधिवेशन सुरु झाल्यानंतर हा मुद्दा आपण उठविणार आहोत.

You might also like