भाषेच्या विविधतेमुळे संसद ‘प्रफुल्‍लीत’, १७ व्या लोकसभेच्या सदस्यांकडून विविध भाषेत ‘शपथ’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – १७ व्या लोकसभेचा शपथविधी यावेळी थोडा वेगळा ठरला. कारण, लोकसभेतील नेत्यांनी शपथ घेताना विविध प्रकारे शपथ घेतली. शपथ सगळ्यांनी एकच घेतली असली तर त्यांची भाषा मात्र वेगवेगळी होती.

संस्कृतपासून डोगरीपर्यंत, विविध भाषेत शपथविधी –

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी जरी हिंदीमध्ये शपथ घेतली असली तर आज अनेक खासदार असे देखील होते की त्यांनी वेगळ्या भाषांमध्ये शपथ घेतली. संसदेत शपथ घेताना आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन सिंह यांनी सर्वांनी चकीतच केले, त्यांनी थेट संस्कृतमध्ये शपथ घेतली. तसेच राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे आणि प्रदीप चंद्र सारंगी यांनी देखील संस्कृतमध्ये शपथ घेतली.

कर्नाटकातून निवडणूक जिंकलेले खासदार प्रल्हाद जोशी आणि मंत्री सदानंद गौडा या दोघांनी देखील कन्नड भाषेत शपथ घेतली.

केरळ मधून संसदेत आलेले काँग्रेसचे खासदार कोडीकुन्निल सुरेश यांनी मातृभाषा मल्याळम सोडून मात्र हिंदीत शपथ घेण्यास पसंती दिली. हिंदीत शपथ घेऊन त्यांनी तेथील उपस्थित खासदारांना चकीत केले. तर जम्मू काश्मिर मधून निवडून आलेले राज्यमंत्री जिंतेद्र सिंह यांनी आपल्या मातृभाषेत डोगरीत शपथ घेतली.

मातृभाषेत शपथविधी पडला पार –

मंत्री हरसिमरत कौर यांनी आपल्या मातृभाषेतून पंजाबीतून शपथ घेतली, तसेच होशियारपूरचे भाजपचे खासदार सोम प्रकाश यांनी देखील पंजाबीतून शपथ घेतली.

केंद्रीय कँबिनेट मंत्री रामेश्वर तेली, कृपानाथ मल्लाह आणि नबा कुमार सरनाई यांनी आसामी भाषेत शपथ घेतली, तर राजगंजच्या खासदार देबाश्री चौधरी आणि सिलचर चे खासदार राजदीप रॉय यांनी बंगालीमध्ये शपथ घेतली.

अशाच प्रकारे आज आंध्रप्रदेशातून निवडून आलेले तेलारी रंगैय्या, वेंगा गीताविश्वनाथ, वायएस अविनाश रेड्डी, बीसेत्ती वेंकट सत्यवती, अदला प्रभाकर रेड्डी यांच्यासह अनेकांनी तेलगू भाषेत शपथ घेतली.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com) 
हृदयविकाराचा झटका आल्यास ‘या’ पाच गोष्टी करा करा ; वाचू शकतो जीव 
हृदयविकाराचा झटका आल्यास ‘हे’ करा ; वाचू शकतो जीव
हे माहित आहे का? आरोग्यासाठी ‘ब्लड ग्रुप’ नुसार चहा पिणे लाभदायक !
आरोग्यासाठी ‘ब्लड ग्रुप’ नुसार चहा पिणे लाभदायक ! 
पित्ताचा त्रास आहे ? मग ‘हे’ कराच