पंतप्रधान पदासाठी आता देखील सर्वात लोकप्रिय नेते आहेत नरेंद्र मोदी, दुसरं कोणी आसपास देखील नाही : सर्व्हे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरियाणा आणि महाराष्ट्रात २१ तारखेला पार पडणाऱ्या मतदानाआधी विविध संस्थांनी मतदानाच्या पूर्व सर्व्हे करून काही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त कोणताही उत्तम नेता नसून हरियाणामध्ये केल्या गेलेल्या सर्व्हेमध्ये मोदींना 71.6 टक्के जनतेने पसंती दर्शवली आहे. तर महाराष्ट्रातील 65 टक्के लोकांनी मोदींना पसंती दर्शवली आहे. तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मनमोहन सिंह यांच्यापेक्षा मोदी खूप पुढे आहेत.

राहुल, मनमोहन आणि सोनिया यांना किती समर्थन
हरियाणामध्ये राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून केवळ 7.6 टक्के लोकांनी पसंती दर्शवली असून महाराष्ट्रात 8.5 टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली आहे. 16 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर रोजी केल्या गेलेल्या सर्वेक्षणातून हि आकडेवारी समोर आली आहे.

ममता, मायावती, मुलायम आणि केजरीवाल हेदेखील खूप मागे
या सर्व्हेत हरियाणामधील जनतेला इतर नेत्यांविषयी विचारण्यात आले. यामध्ये मुलायम सिंह यादव यांना 0.1 टक्के मत, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केवळ 0.3 टक्के लोकांनी तर मायावतींना 2.7 टक्के लोकांनी पसंती दर्शवली. त्याचबरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2.2 टक्के लोकांनी पसंती दर्शवली. तर महाराष्ट्रात शरद पवार यांना पंतप्रधानपदासाठी 7.6 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.

राजनाथ आणि गडकरी यांना किती लोकांचे समर्थन
या पदासाठी सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना 0.3 टक्के लोकांनी पसंती दर्शवली असून नितीन गडकरी यांना 0.1 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काही फरक पडणार का ? या प्रश्नावर हरियाणामध्ये 64.7 आणि महाराष्ट्रामध्ये 64.4 टक्के लोकांनी ‘हो’ उत्तर दिले.

Visit : Policenama.com