Maharashtra Politics News |  पुन्हा ‘खुर्ची’चं राजकारण, मविआच्या बैठकीतील उद्धव ठाकरेंच्या जागेवरुन शिंदे गटाच्या नेत्याचा टोला; म्हणाले-‘सामान्य सोफ्यावर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News |  कर्नाटकात (Karnataka Election) भाजपचा (BJP) मोठा पराभव झाल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) उत्साहाचं वातावरण आहे. कर्नाटकातील निकालानंतर मविआच्या नेत्याची रविवारी मविआची शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) नेते उपस्थित होते. या बैठकीत आगामी (Maharashtra Politics News) निवडणुकांवर चर्चा झाली.

या बैठकीतमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांच्या शेजारी सोफ्यावर बसले होते. तर शरद पवार हे वेगळ्या खुर्चीवर बसले होते. शरद पवार वगळता सर्व नेते सोफ्यावर बसले होते. महाविकास आघाडीच्या बैठकीतल्या आसन व्यवस्थेवरुन शिवसेना (शिंदे गट) नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Maharashtra Politics News)

संख्याबळ घटल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा मान सन्मान गेला आहे, त्यांना सामान्य सोफ्यावर बसण्याची वेळ आली आहे. हे मनाला खटकलं आहे. संख्याबळ नसल्यामुळे उद्धव ठाकरेंना सामान्य कोचवर बसण्याची वेळ आली आहे, असा टोला शंभूराज देसाई यांनी लगावला. तसेच संजय राऊत (Sanjay Raut) म्हणजे चुकीची चिठ्ठी काढणारा भविष्य सांगणारा पोपट आहे, असा टोलाही देसाई यांनी राऊतांना लगावला.

 

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवेळी (MVA Vajramuth Sabha) खुर्चीवरून राजकारण रंगलं होतं.
संभाजीनगर येथे झालेल्या सभेवेळी उद्धव ठाकरे यांना वेगळी खुर्ची दिली होती. त्यावेळी उलटसुलट चर्चा झाल्या होत्या.
उद्धव ठाकरे यांना पाठीचा त्रास आहे, त्यांची शस्त्रक्रिया झाली आहे.
त्यामुळे त्यांना वेगळ्या प्रकारची खुर्ची देण्यात आल्याचे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलं होतं.
यानंतर नागपूरमध्ये झालेल्या सभेत सगळ्या नेत्यांसाठी एकसारख्या खुर्चा ठेवण्यात आल्या होत्या.

 

Web Title :- Politics of ‘chair’ again, leader of Shinde group from Uddhav Thackeray’s place
in Mahavikas Aghadi meeting; Said – ‘On the common sofa…’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | राज ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले-‘आमच्या पराभवाचं विश्लेषण…’ (व्हिडिओ)

Akola Riots | ‘दंगलीची माहिती पोलिसांना…’, अकोला दंगलीवरुन राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप;
देवेंद्र फडणवीसांकडे केली ‘ही’ मागणी

Chandrakant Patil – Kothrud Pune News | ना आश्वासन, ना तारीख थेट संवाद द्वारे जागेवर निर्णय;
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोथरुडमधील उपक्रमाचा तिसरा टप्पा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणीकंद पोलिस स्टेशन – 3 हजार रूपयांसाठी संगणक अभियंत्याचा खून
करणार्‍या कॅब चालकाला अटक; जाणून घ्या मर्डरची स्टोरी