Pollen Allergy | वसंत ऋतुमध्ये काही लोकांना खुप त्रस्त करू शकते ‘पोलन अ‍ॅलर्जी’, जाणून घ्या तिची 7 लक्षणे आणि बचाव

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pollen Allergy | मार्च महिन्यात फारशी थंडी किंवा उष्णता नसते. आजूबाजूला फुललेल्या रंगीबेरंगी फुलांचे सौंदर्य सर्वांनाच मोहित करते, परंतु त्यांच्या परागकणांपासून (Pollen Particles) होणारी अ‍ॅलर्जी (Pollen Allergy) अनेक लोकांना त्रास देते. हे टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.

 

का होते ही समस्या (Why Does This Problem Happen) ?
वसंत ऋतूमध्ये हवामान खूप आल्हाददायक असते आणि जर तुम्ही एखाद्या उद्यानाभोवती फिरत असाल, तर त्याभोवती रंगीबेरंगी हंगामी फुलांचा सुंदर सुगंध पसरलेला असतो.परंतु यामुळे काही लोकांना अ‍ॅलर्जीचा त्रास (Allergic Problems) होतो.

 

वास्तविक फुलांमध्ये एक अतिशय बारीक पावडर सारखा घटक असतो, ज्याला पोलन (Pollen) किंवा परागकण म्हणतात. जे फुले किंवा कोणत्याही प्रकारच्या वनस्पतींना निषेचित (Fertilize) करण्याचे काम करते. त्यामुळे झाडे व वनस्पतींची फुले व फळे यांची संख्या वाढते. फुलपाखरू, मधमाशी किंवा भुंगा, जेव्हा एका फुलावर बसल्यानंतर, दुसर्‍या फुलावर जातात, तेव्हा त्यांच्या पायाला चिकटलेले पराग कण त्याच प्रजातीच्या दुसर्‍या फुलाला निषेचित करण्याचे काम करतात.

 

हे परागकण इतके लहान असतात की ते हवेत तरंगत असतात आणि श्वासासोबत थेट फुफ्फुसात (Lungs) जातात. हे कण बाह्य घटक असल्याने, व्यक्तीचे शरीर ते स्वीकारत नाही आणि आपली इम्युनिटी (Immunity) त्यांच्याशी लढण्यासाठी सतर्क होते. परिणामी, शरीरात अ‍ॅलर्जीची (Pollen Allergy) प्रतिक्रिया लगेच सुरू होते.

 

महत्वाची लक्षणे (Symptoms Of Pollen Allergy)

प्रत्येक व्यक्तीमध्ये परागकण अ‍ॅलर्जी झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात, परंतु काही सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत –

1. वारंवार शिंका येणे (Frequent Sneezing)
2. घसा खवखवणे (Sore Throat)
3. नाक वाहणे (Cold)
4. जळजळ होणे (Inflammation)
5. पाणी येणे
6. श्वास लागणे (Shortness Of Breath)
7. ताप येणे (Fever)

या अ‍ॅलर्जीशी संबंधीत तापाला ’हे फिव्हर’ म्हणतात. ज्यांना आधीच दम्याची समस्या आहे, त्यांचा परागकणांच्या अ‍ॅलर्जीमुळे त्रास वाढतो. गंभीर प्रकरणांमध्ये, श्वासनलिका अरुंद होऊ लागते आणि त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. या समस्येला अ‍ॅलर्जीक रायनाटिस असेही म्हणतात.

 

बचाव कसा करायचा (How To Prevent)

बाहेर जाताना एन-95 मास्क (N-95 Mask) आणि सनग्लासेस (Sunglasses) घाला.

घरात कोणाला अ‍ॅलर्जीचा त्रास असेल तर दिवसा खिडक्या बंद ठेवा.

इम्युनिटी मजबूत करण्यासाठी, आहारातील प्रोटीन (Protein) आणि व्हिटॅमिन सी-युक्त (Vitamin C) पदार्थ जसे की डाळ, अंकुरलेले धान्य (Sprouted Grains), सोयाबीन (Soybean), अंडी (Eggs), चिकन (Chicken) आणि संत्र्यासारखी (Orange) आंबट फळे (Sour Fruits) यांचा समावेश करा.

दम्याची समस्या असेल या बदलत्या ऋतूत बाहेर फिरायला जाऊ नका.

दम्याचे रुग्णांनी या ऋतूत विशेष काळजी घ्यावी. सर्व औषधे योग्य वेळी घ्यावी.

सहसा ही समस्या औषधांनी नियंत्रित केली जाऊ शकते, तरीही उपचारापेक्षा प्रतिबंध करणे चांगले असते. म्हणून या ऋतूमध्ये अ‍ॅलर्जीपासून स्वतःचे संरक्षण करा.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

#Lifestyle #Health #Pollen Allergy #Pollen Allergy symptoms #Pollen Allergy Causes #Pollen Allergy Prevention #Spring Season Allergy #Hay Fever #Allergic Rhinitis #Lifestyle And Relationship #Health And Medicine

 

Web Title :- Pollen Allergy | pollen allergy know about its causes symptoms prevention and other important things

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corporation | पुणे मनपाचे प्रशासक विक्रम कुमार यांचा दणका ! शहरात अतिक्रमण कारवाईला सुरुवात

 

Diabetes Diet | ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेमुळे होऊ शकतो ‘टाईप- 2 डायबिटीज’चा धोका, ‘या’ फूड्सद्वारे पूर्ण करा ही कमतरता

 

Weight Loss | वाढत्या वजनाने असाल त्रस्त तर ‘या’ 5 आयुर्वेदिक पद्धतीने कमी करा फॅट; जाणून घ्या