म्हणून परभणीत ग्रामस्थांनी मतदान केंद्राबाहेरच केली पोलिसांना मारहाण

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – मतदानाच्या दिवशीच मानवत तालुक्यातील शेवडी येथील ग्रामस्थांनी मतदान केंद्राबाहेरच पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. पोलिसांच्या गाडीचीही तोडफोड केली. मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांना सूचना दिल्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी पोलिसांना मारल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रात १० मतदार संघात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यातील मतदान सुरु आहे. यामध्ये परभणी लोकसभा मतदार संघाचाही समावेश आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील शेवडी येथे सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरु आहे. सकाळपासून शांततेत मतदान होत होते. याचदरम्यान, मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांना सरळ रांगेत उभे राहा आणि फोनवर बोलू नका अशा सूचना पोलिसांनी दिल्या. त्यावेळी मतदारांमध्ये आणि पोलसांमध्ये वाद झाला. याच वादामधून ग्रामस्थांनी पोलिसांना मारहाण केली.

इतकेच नव्हे तर, मारहाणी नंतर तिथे असलेल्या पोलिसांच्या गाड्यांचीही तोडफोड केली. यामारहाणीत पोलिस उपनिरिक्षक जखमी झाले आहेत.

परभणी लोकसभा मतदार संघात शिवसेने उमेदवार संजय जाधव तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यात टोकाची लढत होतांना दिसत आहे. आता २३ मे रोजी कळेल परभणीत शिवसेना आपला बालेकिल्ला राखणार की राष्ट्रवादी त्यांला सुरुंग लावणार.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like