पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी ७९६ उमेदवार रिंगणात, २५ सप्टेंबरला मतदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

जिल्ह्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या होत असलेल्या निवडणुक रिंगणात असलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ७९६ उमेदवार सदस्यपदासाठी, तर सरपंचपदासाठी १४४ उमेदवार रिंगणात असणार आहेत. या निवडणुकांसाठी २५ सप्टेंबर रोजी मतदान होणार असून, २७ सप्टेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

[amazon_link asins=’B01F7AX9ZA,B0778JFC13′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cc5b38d6-bbc2-11e8-ba5a-cf008c07c004′]

सदस्य पदासाठी एक हजार ३११ उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी २६ अर्ज बाद ठरले, तर ४८९ उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने ७९६ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक २६७ उमेदवार हे इंदापूरमधील १४ ग्रामपंचायमधील आहेत. भोरमधील दोन ग्रामपंचायतींसाठी सर्वात कमी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. तर सरपंच पदासाठी ३०० उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी चार अर्ज बाद ठरले, तर १५२ इच्छुकांनी अर्ज मागे घेतल्याने १४४ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. सरपंच पदासाठी सहा ठिकाणी पोटनिवडणुका होणार आहेत. त्यापैकी वेल्ह्यातील दोन ग्रामपंचायती आणि भोरमधील तीन ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी एकही अर्ज आला नाही. खेडमधील एका ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी एकच अर्ज आल्याने ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
 

बहिणीवर संशय घेतो म्हणून मेहुण्याकडून खुनी हल्ला

[amazon_link asins=’B078124279,B07DRJ4HD6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’334a8a55-bbc3-11e8-a65a-8116eb92e74a’]