ईव्हीएमबद्दल तक्रारी ; देशात ३०३ मतदार संघात झाले मतदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ईव्हीएमविषयीच्या तक्रारी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी मतदानावेळी चालू होत्या. तसेच केरळात व्हीव्हीपॅटमधून साप निघाल्याने कर्मचारी व मतदारांची झुंबड उडाली होती. सगळीकडे भीती जनक वातावरण झाले होते. पश्चिम बंगालमध्ये भाजप व तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली. तसेच केरळमध्ये मतदानाच्या रांगेत चौघांचा मृत्यू झाला. त्या मारामारीमध्ये गावठी बॉम्ब फेकण्यात आले. त्यात मतदान करायला आलेल्या एक मतदाराचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत हि ११७ मतदारसंघातील ६६ टक्के नागरिकांनी मतदान केले.

आतापर्यंतच्या तीन टप्प्यांत मिळून लोकसभेच्या निम्म्याहून अधिक म्हणजे ३०३ मतदारसंघांत मतदान पूर्ण झाले आहे. यापुढील चार टप्प्यांत २४० मतदारसंघांत मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील उरलेल्या १८ मतदारसंघांमध्येही २९ एप्रिल रोजी मतदान होईल. राज्यातील ३० मतदारसंघांत दोन टप्प्यांत मतदान पूर्ण झाले आहे. तसेच दिग्गजांनी सुद्धा मतदान केले. व कडकीचे ऊन असल्यामुळे काही राज्यामध्ये मतदानाचा परिणाम झाला. मतदानाच्या वेळी मंगळुरूमध्ये जोरदार पाऊस सुरू झाल्याने मतदारांची एकच तारांबळ उडाली. पहिल्या दोन टप्प्यांपेक्षा तिसऱ्या टप्प्यांत मतदान यंत्रांविषयी असंख्य तक्रारी आल्या.

काही ठिकाणी मतदान यंत्रे नीट न चालल्यामुळे नागरिकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागले होते.