Pollution Certificate बाबत निष्काळजीपणा पडू शकतो महागात, ‘RC’ होईल सस्पेंड, जाणून घ्या मोदी सरकार काय करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  मोदी सरकार (Modi Government) देशातील नागरिकांसाठी रोज नवनवीन नियम आणत आहे. आता वाहनांसंबंधी आणखी एक नवीन नियम सरकार आणणार आहे. वाहनांचे पोल्यूशन सर्टिफिकेट (Pollution Certificate) म्हणजे PUC बाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पोल्यूशन अंडर कंट्रोल (PUC) आता सर्व वाहनांसाठी संपूर्ण देशात यूनिफॉर्म केले जाईल. सोबतच पीयूसी नॅशनल रजिस्टरसोबत (Pollution Certificate) लिंक केले जाईल.

पीयूसी सर्टिफिकेट राज्यात वेगवेगळ्या रूपात आणि फॉर्मेटमध्ये असते. परंतु आता सरकारने निर्णय घेतला आहे की आता संपूर्ण देशात पीयूसी एकसारखे असेल आणि सोबतच यामध्ये काही नवीन फीचर्सचा सुद्धा समावेश केला जाईल.

 

 

काय आहे नवीन पीयूसीच्या नियमांचे वैशिष्ट्य

1. रस्ते परिवहन मंत्रालयाने PUC चा नवीन फॉर्मेट जारी केला आहे, जो संपूर्ण देशात एकसारखा असेल.

2. पीयूसी फॉर्मवर QR कोड असेल, ज्यामध्ये मालकाचे नाव, एमिशन स्टेटस इत्यादी अनेक प्रकारची माहिती असेल.

3. पीयूसी डेटाबेस नॅशनल रजिस्टरसोबत जोडले जाईल. नॅशनल रजिस्टरमध्ये नोंदलेल्या माहितीने पोल्यूशन सर्टिफिकेट लिंक असेल.

4. नवीन PUC फॉर्ममध्ये आता गाडीच्या मालकाचा मोबाइल नंबर असेल, त्याचा पत्ता, गाडीचा इंजिन नंबर आणि चेसीस नंबर असेल.

5. पीयूसीमध्ये गाडी मालकाचा मोबाइल नंबर अनिवार्य आहे. ज्यावर व्हॅलिडेशन आणि फीसाठी एसएमएस अलर्ट येईल.

6. पहिल्यांदा रिजेक्शन स्लिपची सुरुवात करण्यात आली आहे. जर एखाद्या गाडीत प्रदूषण स्तर ठरलेल्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्यास रिजेक्शन स्लिप दिली जाईल.

7. ही स्लिप घेऊन गाडीच्या सर्व्हिसिंगसाठी सेंटरवर जावे लागेल. पोल्यूशन मोजावे लागेल.

8. जर अंमलबजावणी अधिकार्‍याकडे हे समजण्याचे कारण आहे की गाडी एमिशन मानकांच्या तरतुदींचे उल्लंघन करत आहे. तर तो लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक मोडच्या माध्यमातून चालक किंवा वाहकाच्या प्रभारी व्यक्तीला गाडी चाचणीसाठी एखाद्या ऑथराइज्ड टेस्टिंग सेंटरमध्ये जमा करण्याचे निर्देश देऊ शकतो.

9. जर वाहन मालकाने चाचणीसाठी वाहन आणले नाही तर त्यास पेनल्टी लागेल. रजिस्ट्रेशन अधिकारी लेखी कारण नोंदवल्यानंतर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) आणि परमिट निलंबित करू शकतो.

10. हे निलंबन तोपर्यंत राहिल, जोपर्यंत PUC तयार होत नाही.

 

Web Title : Pollution Certificate | new puc rules are ready to implement for vehicles see the details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anti-Corruption | नगरपालिकेचे मुख्याधिकारी 28 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Pune Corporation | भाडेतत्वावर नको आपणच खरेदी करू ई-व्हेईकल; शिवसेनेची भुमिका, वाहनचालकांना पाठींबा

Modi Government | ‘या’ व्यवसायासाठी 5 लाखांची करा गुंतवणूक आणि मिळावा महिन्याला 70 हजार रुपये, जाणून घ्या