राजधानी दिल्लीला पडला हवा प्रदूषणाचा वेढा

नवी दिल्ली | वृत्तसंस्था  – दिल्लीत सोमवारी सकाळी उगवत्या सूर्याबरोबर दाठ धुक्याचे साम्राज्य पसरल्याने दिल्लीत हवा प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांना श्वास घेण्यासाठी अडथळा निर्माण होत असून दिल्ली शहरातील काही भागात प्रशासनाच्या वतीने पाण्याच्या फवाऱ्याची व्यवस्था उभारून हवेतील प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे.

थंडीच्या ऋतूत दिल्लीच्या वातवरणात वातावरणाची समस्या निर्माण होण्याची हि पहिली वेळ नसून सतत या प्रकारच्या समस्या उदभवत असल्याचे दिसून आले आहे. गेल्यावर्षी याच मुद्द्यावर दिल्लीचे राजकारण तापले होते. प्रदूषणाची समस्या निर्माण झाल्यावर केंद्राने त्यावर पावले उचलायची कि राज्याने यावरून वादाची राळ उडाली होती.

आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज रंगणार दुसरा टी-२० सामना

मागील वर्षी राजधानी दिल्लीला असाच हवेच्या प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा दिल्लीचे जणजीवन ठप्प झाले होते. उत्तर भारतात दिल्लीच्या शहरानजीक असणाऱ्या वीटभट्ट्या या दिल्लीच्या दूषित हवामानाचे मूळ आहेत असे बोलले जाते. तसेच पंजाब हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील टाकाऊ पदार्थ जाळल्याने हि हे प्रदूषण होत असल्याचे मत व्यक्त होत आहे. दिल्लीच्या प्रदूषणावर काय तोडगा काढण्याचा सूर सर्व स्तरातून व्यक्त होत आहे .तसेच प्रशासन करत असलेल्या उपाय योजना कुचकामी असल्याची टीका हि सर्व स्तरातून उमटत आहे.

काल रात्री हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरी ७०७ असा नोंदवला होता तर नेहरू स्टेडियम येथे सर्वाधिक ८८१ निर्देशांक नोंदवण्यात आला. सदर निर्देशांक धोकादायक स्तरात गणला जात असून आगामी काळात या निर्देशांक वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या आरंभीच हवेचा स्तर एवढा घसरल्याने पर्यावरण तज्ञाकडून या समस्ये बद्दल चिंता व्यक्त करण्यात येते आहे. वातावरणातील हवेचा स्तर २० पटीने खाली आला आहे, असे मत हवामान तज्ञांनी व्यक्त केले आहे. वातावरणातील धुक्याचा स्तर आगामी दोन दिवस असाच टिकून राहणार आहे म्हणून दिल्लीकरांची दिवाळी धुक्याच्या सावटा खाली साजरी होणार आहे.