पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर ! ‘या’ तारखेला लागणार अंतिम गुणवत्ता यादी

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे. प्रथम वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सोमवार (ता. ७) डिसेंबर रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी पाहता येणार आहे.

गुणवत्ता यादीत काही अडचणी असल्यास, आक्षेप असल्यास गुरुवार (ता. १०) डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना वेळ दिलेला आहे. प्रवेश प्रक्रिया संबंधित अडचणी असल्यास डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू. डीटीई. इन या संकेत स्थळावर अथवा शासकीय तंत्रनिकेतन मूर्तिजापूर येथील सुविधा केंद्रावर संपर्क करावा. प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रियेला मिळालेला मुदतवाढीचा अकोला जिल्ह्यातील तसंच इतर जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असं आव्हान शासकीय तंत्रनिकेतन मुर्तीजापुर संस्थेचे प्राचार्य डॉ. ए. ए. गुल्हाने यांनी केलं आहे.

दरम्यान, अंतिम गुणवत्ता यादी शनिवार (ता. १२) डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्याच दिवसापासून १४ तारखेपर्यंत विद्यार्थी पहिल्या राऊंडसाठी पसंतीक्रम नोंदू शकतात.