लासलगाव बाजार समितीतील डाळिंब लिलावस सुरूवात

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन  –  येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या लासलगांव मुख्य बाजार आवारावर डाळींब लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे सदस्य रमेश पालवे यांच्या हस्ते करण्यात आला.

लासलगांवसह परीसरातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगांव, सिन्नर, कोपरगांव, राहुरी, राहाता, नेवासा, गंगाखेड, वैजापुर, कन्नड तालुक्यातील गावांमध्ये शेतक-यांनी डाळींब ह्या शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली असल्याने त्यांना मालविक्रीची सोय व्हावी म्हणुन बाजार समितीतर्फे डाळींब लिलावास सुरूवात करण्यात आली. डाळींब उत्पादकांनी आपला माल योग्य प्रतवारी करून विक्रीसाठी आणावा. वजनमापानंतर लगेच रोख पेमेंट देण्यात येणार आहे. डाळींब खरेदीसाठी मोठ्या संख्येने खरेदीदार सहभागी होणार असल्याने स्पर्धात्मक बाजारभावामुळे योग्य दर मिळण्यास मदत होईल असे पालवे यांनी उदघाटन प्रसंगी सांगितले.

डाळींब खरेदीस इच्छुक असणा-या व्यापा-यांनी लायसेन्सबाबतच्या सर्व अटी पुर्ण केल्यास तात्काळ परवाना देऊन पॅकींग व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले.

सुरूवातीस गणेश अरूण जगताप, रा. मुरमी ह्या शेतक-याचा डाळींब शेतमाल रू. 2,152/- ह्या बाजारभावाने जिब्राईल आमिन नाईकवाडी यांनी खरेदी केला. दिवसभरात 865 क्रेटची आवक होऊन बाजारभाव कमीत कमी रू. 300/- जास्तीत जास्त रू. 2152/- सरासरी रू. 950/- याप्रमाणे होते.

याप्रसंगी बाजार समितीचे सहाय्यक सचिव एस. जी. टर्ले, पी. आर. कुमावत, लेखापाल ए. डी. गायकवाड, एस. एन. विखे, हिरालाल सोनारे, प्रभारी एस. एस. पवार, डाळींब व्यापारी तौसीफ बागवान, सैय्यद मोहसीन सैय्यद मुश्ताक, तबरेज शेख, गफ्फार नाईकवाडी, अखलाख हुसेन अन्सारी, मोहंमद अख्तर यासीन, संजय साळुंके, कैलास सोनवणे आदि उपस्थित होते.