पुरुषांनी डाळिंब आठवड्यातून एकदा तरी खावे, यामुळे वाढतात सेक्स हार्मोन्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम – डाळिंब हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशिर आहे. याचा सेवनाने शरीराला अनेक लाभ होऊ शकतात. अशा या डाळिंबाचा उल्लेख बायबलमध्येही आढळतो. डाळिंबामधील अँटिऑक्सिडंट्स पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन्स वाढवतात. यामुळे प्रजननक्षमताही वाढते. डळिंबाचे कोणकोणते फायदे आहेत, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. हे शरीरातील टेस्टेस्टेरॉन हार्मोन्स वाढवतात. यामुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि वीर्याची पातळी दोन्हीही वाढतात. आठवड्यातून एकदा कमीत कमी १०० ग्रॅम डाळिंबाचे दाणे खावेत. डाळिंबाचा ज्यूस देखील पिता येईल. डाळिंबाचा उल्लेख बायबल आणि ग्रीक मायथोलॉजीमध्ये आहे. बायबलमध्ये याला पवित्र फळ मानून दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते.

पिझ्झा, बर्गरसारखे फास्ट फूड खाल्ल्याने गर्भधारणेत अडचण होते. महिलांसाठी डाळिंब फायदेशीर आहे. यामध्ये फॉलिक अ‍ॅसिड असते, जे महिलांना गर्भधारणा करण्यात मदत करते. हे प्रेग्नन्सीमध्ये बाळाच्या विकासासाठी गरजेचे आहे.

डाळिंबाचे अनेक फायदे आहेत. डाळिंबाने कोलेस्टेरॉल पातळी कमी होते. हे हृदयाच्या तक्रारींपासून बचाव करते. यामध्ये व्हिटॅमिन-सी असते. ज्यामुळे कमजोरी दूर होते. डाळिंबामध्ये फायबर्स असतात. यामुळे पचनशक्ती चांगली राहते. बद्धकोष्ठता दूर होते. डाळिंबाच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन-ए असते. यामुळे डोळ्यांची शक्ती वाढते. यामध्ये व्हिटॅमिन-ई असते. ज्यामुळे सौंदर्य उजळते.