मुलांच्या आरोग्यासाठी डाळिंब लाभदायक

पोलीसनामा ऑनलाइन – डाळिंब हे पोषणयुक्त आणि मुलांच्या वाढीला, विकासाला चालना देणारं फळ आहे. त्यामुळे मुलांना डाळिंब आवश्य द्या. एखाद्या पदार्थामधून मुलांना जास्तीत जास्त पोषक घटक मिळतील हे पाहणं गरजेचं आहे. डाळिंबामध्ये अँटि-मायक्रोबिअल घटक असतात, त्यामुळे मुलांचे तोंड स्वच्छ राहिल. डाळिंबातील व्हिटॅमिन सीदेखील तोंडाचं आरोग्य सुधारण्यास मदत करतं. कॅविटिज आणि हिरड्यांचे आजार बळावण्याचा धोका कमी होतो.

लहान मुलांच्या पोटामध्ये जंत असणं हे सामान्य आहे. नियमित डाळिंबाचं सेवन केल्यानं पोटातील या जंताचा नाश होतो. कॅन्सर हा कोणत्याही वयात होऊ शकतो. त्यामुळे लहान मुलांना नियमित डाळिंब देणं गरजेचं आहे. डाळिंबाध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे कॅन्सरला दूर ठेवतात. डाळिंब रसाळ आणि फायबरयुक्त असतं, ज्यामुळे मुलांना शौचास साफ होण्यास मदत होते. डायरियाची समस्या दूर होते. डाळिंबामुळे यकृताचं कार्य सुरळीत राहण्यास मदत होते. रक्तातील विषारी घटक दूर करण्यासही डाळिंब उपयुक्त आहे.

डाळिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं, ज्यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप ही समस्या उद्भवत असते. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी डाळिंब खायला द्यावं. डाळिंबामध्ये आयर्न असतं, जे शरीराला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी मदत करतं. डाळिंब खाल्ल्यानं मुलांमध्ये आयर्नची कमतरता राहत नाही, परिणामी त्यांना अनिमिया होण्याचा धोका दूर होतो. मुलांची वाढ आणि विकासासाठी खेळ खूप महत्त्वाचा आहे. जास्त खेळल्यानं अनेकदा मुलांचे स्नायू दुखतात. अशावेळी मुलांना डाळिंब फायदेशीर ठरतं. डाळिंबामध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे स्नायूंच्या वेदना दूर होतात. लहान मुलं अनेकदा पडतात त्यांना लहान लहान दुखापती, जखम होतच असतात. त्यांच्या शरीरावर सूज येते. अशावेळी डाळिंबातील इन्फ्लेमेटरी घटक फायदेशीर ठरतात.