Nach Baliye 9 : सरावा दरम्यान अभिनेत्रीसोबत घडलं ‘असं’ काही, शो अर्ध्यातूनच सोडून केलं ‘बाय-बाय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – स्टार प्लसचा धमाकेदार शो ‘नच बलिये 9’ दर आठवड्याला टीव्हीवर काहीतरी नवीन धमाका नक्कीच करतो. या शोची जवळपास प्रत्येक जोडी कठोर परिश्रम कतरे पण अलीकडेच ‘नच बलिये 9’ शी संबंधित एक बातमी समोर आली आहे.  पूजा बॅनर्जी आणि शोची जोडी संदीप सेजवाल यांच्या रिहर्सल दरम्यान एक घटना घडली आहे ज्यामध्ये शोची स्पर्धक पूजा बॅनर्जी गंभीर जखमी झाली आहे. पूजा बॅनर्जी आणि तिचा पार्टनर संदीप सेजवाल यांना दुखापतीमुळे शो मधूनच सोडावा लागणार आहे.

पूजा बॅनर्जी हीचा पती संदीप सेजवाल यांनी या घटनेविषयी सांगितले. त्यांनी सांगितले की, “या ऍक्टमध्ये पूजाला माझ्या खांद्यावर उभे रहायचे होते आणि मागच्या बाजुने पडायचे होते, म्हणजे कोरियोग्राफर त्यांना पकडेल. पण ती घसरली आणि तिचा तोल गेला, ज्यामुळे पूजा सुमारे 10 फूट उंचीवरुन खाली गेली व ती तिच्या हातावर पडली, ज्यामुळे तिच्या हातांना दुखापत झाली आहे. तिचे मनगटही फॅक्चर झाले आहे आणि तिच्या कोपरलाही दुखापत झाली आहे. आता ती एक आठवडाभर रुग्णालयात राहील. ”

संदीप सेजवाल यांनी पुढे सांगितले की, “नच बलिये” हा कपल आधारित शो आहे, म्हणून मी आणि पूजा हा शो पुढे चालू ठेवू शकणार नाहीत. त्यामुळे आम्ही शो सोडत आहोत. ” पूजा बॅनर्जी व्यतिरिक्त या शो ची अन्य स्पर्धक उर्वशी ढोलकियासुद्धा रिहर्सल वेळी जखमी झाली आहे.