सलमान खानच्या या मित्रासोबत अभिनेत्री पूजा बत्राचे ‘झेंगाट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री पूजा बत्रा आपल्या पर्सनल लाईफसाठी खूप चर्चेत आहे. पूजा बत्रा ही ९० दशकातील अभिनेत्री आहे. जीने अनिल कपूरसोबत ‘विरासत’ आणि गोविंदा सोबत ‘हसीना मान जायेगी’ मध्ये काम केले आहे. ही अभिनेत्री २०११ नंतर चित्रपटसृष्टीतून गायब झाली आहे. सध्या तिच्या पर्सनल गोष्टीसाठी खूप चर्चेमध्ये आहे. अभिनेत्री पूजा बत्रा नवाब शाहला डेट करत आहे. दोघांचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या फोटोला पाहून असे समजत आहे की, दोघेही रिलेशनशिपमध्ये आहे.

नवाब शाहने आपल्या इन्स्टाग्रामवर पूजासोबतचे फोटो शेअर केले आहे. या आधी देखील या दोघांचे फोटो सोशल मिडियावर पहायला मिळाले आहे. नवाब शाह सलमान खानचा चित्रपट ‘टाइगर जिंदा है’ मध्ये दिसून आला होता. त्याने २००० मध्ये राजीव कुमारचा चित्रपट ‘राजा को रानी से प्‍यार हो गया’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

पूजा बत्राने २००२ मध्ये ऑर्थेापेडिक सर्जन सोनू एस अहलूवालिया सोबत लग्न केले होते. यानंतर चित्रपटांमुळे त्यांच्यात दुरावा आला. कालांतराने त्याच्या वैवाहिक जीवनात खूप वादविवाद होऊ लागले. २०११ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर तिने पुन्हा चित्रपटामध्ये पुन्हा काम सुरु केले. २०१५ मध्ये ती ‘एबीसीडी २’ मध्ये दिसून आली. २०१६ मध्ये एक पंजाबी चित्रपटात दिसून आली होती. पूजा बत्रा एक समाजसेविका आणि एक चांगली अभिनेत्रीसुद्धा आहे. तिने २५० मॉडेलिंग प्रोग्रॅममध्ये सहभाग घेतला आहे. १९९३ मध्ये फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनलता ताज तिने मिळवला आहे.

 

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.